Categories: Editor Choice

… तर गाडीच्या इन्शुरन्ससाठी करता येणार नाही क्लेम , ‘ या ‘ परिस्थितीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑक्टोबर) : सर्वोच्च न्यायालयाने गाडीच्या इन्शुरन्सबाबत मोठा निर्णय दिला आहे. जर एखाद्या वाहनाची वैध नोंदणी नसेल, तर विमा कंपनी दावा नाकरू शकते. नोंदणीशिवाय वाहनाचा वापर करणं हे विम्याच्या अटी आणि नियमांचं उल्लंघन आहे.

एका गाडी चोरीनंतर विमा दाव्याची रक्कम भरण्याच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही बाब सांगितली आहे. न्यायमूर्ती यू.यू ललित, न्यायमूर्ती एस. रविंद्र भट आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सांगितलं, की न्यायालयाचं कायदेशीर मत महत्त्वपूर्ण आहे, की ज्यावेळी एखादी विमायोग्य घटना घडते, ज्यामुळे संभाव्य Lability येते, तेव्हा ते विमा कराराच्या अटींचं उल्लंघन करत नाही. यात राजस्थान राज्य आयोगाने सुशील कुमार गोदाराला 6,17,800 रुपये देण्याच्या आदेशाला आव्हान दिलं होतं.

▶️काय आहे प्रकरण? 
या प्रकरणात विमा पॉलिसीधारकाने नवीन गाडी खरेदी केली होती, ज्याची तात्पुरती नोंदणी होती. हे तात्पुरत रजिस्ट्रेशन संपल्यानंतर त्यांनी आपल्या शहराबाहेर प्रवास केला. गाडी गेस्ट हाउस कँपसमध्ये उभी असताना, तेथून चोरीला गेली. त्यानंतर त्यांनी विम्यासाठी दावा केला परंतु गाडीची तात्पुरती नोंदणी संपल्याचं कारण देत त्यांचा दावा नाकारण्यात आला.

त्यानंतर त्यांनी जिल्हा फोरमशी संपर्क साधला आणि विमा कंपनीला गाडीसाठी 1,40,000 रुपयांच्या भाड्याच्या रकमेसह विम्याची रक्कम देण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. रजिस्ट्रेशन वैध नाही – परंतु गाडी चोरी झालेल्या दिवशी, त्या तारखेला वाहन वैध नोंदणीशिवाय चालवलं गेलं, जे मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन आहे. यामुळे नियम आणि अटींचंही मूलभूत उल्लंघन होतं. त्यामुळेच विमा कंपनीला पॉलिसी नाकारण्याचा अधिकार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

14 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

21 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago