Google Ad
Editor Choice

भोसरी एमआयडीसीतील वीज गेल्यानंतर उद्योजकांना एसएमएस आणि कॉल सेंटर सुविधा निर्माण करावी … अभय भोर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ ऑक्टोबर) : एमआयडीसीतील वीज गेल्यानंतर उद्योजकांना एसएमएस आणि कॉल सेंटर सुविधा निर्माण करावी या प्रश्नांसंदर्भात आज फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि उद्योजक यांनी महावितरणचे मुख्य अभियंता माननीय भोसले साहेब यांना निवेदन दिले निवेदनात एमआयडीसीमध्ये लाईट गेल्यानंतर उद्योजकांना एसएमएस द्वारे सदर लाईट कधीपर्यंत येऊ शकेल याची माहिती मिळाल्यास आणि आपली तक्रार नोंदविण्यासाठी स्वातंत्र्य हेल्पलाइन नंबर महावितरणाने द्यावा जेणेकरून उद्योजकांना लाईट संदर्भात सूचना मिळू शकेल.

या निवेदनात अभय भोर यांनी म्हटले आहे की, ‘अनेकदा लाईट गेल्यानंतर उद्योजकांना लाईट कधी येईल याच्याबाबत अजिबात कल्पना नसते त्यामुळे त्याच्या प्रोडक्शनवर मोठा फरक पडत असून अनेक वेळा आठ-आठ तास कामगारांना बसून पगार द्यावा लागतो परंतु जर कॉल सेंटर द्वारे एसएमएस सुविधा चालू केल्यास उद्योजकांना योग्य तपशील समजू शकेल आणि उद्योजक योग्य तो निर्णय घेऊन आपली कामे करू शकतील अनेकदा महावितरणाच्या वेगवेगळ्या नंबर वर फोन केल्यास नंबर व्यस्त असतात किंवा योग्य नंबर वर याची माहिती मिळू शकत नाही याबाबत महावितरणाने त्वरित उद्योजकांना एसएमएस आणि कॉल सेंटर सुविधा निर्माण केल्यास उद्योजकांच्या समस्या सुटू शकतील.

Google Ad

तसेच औद्योगिक परिसरासाठी स्वतंत्र पथक निर्माण करावे जेणेकरून विज गेल्यानंतर उद्योग परिसरातील लाईटच्या समस्या त्वरित निवारण करण्यास सहज होईल बऱ्याच वेळा मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक भागातील उद्योग दुरुस्ती न झाल्यामुळे बंद पाडतात आणि उद्योग क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.

महावितरणचे मुख्य अभियंता श्री भोसले साहेब यांनी यावर त्वरित तोडगा काढून उद्योजकांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली याप्रसंगी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर उपाध्यक्ष वैभव जगताप, उद्योजक थॉमस मथाई, ऋषिकेश जोशी, शाहिद पठाण, अजय बिडवे, रोनाल्ड जॉर्ज, अतुल खैरनार श्री शिवाजी पाटील प्रशांत पठारे संभाजी लोखंडे इत्यादी उद्योजक उपस्थित होते अनेक उद्योजक सभासद उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!