Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

अहो, लक्ष द्या … महापौरांच्या प्रभागातच ठेकेदारांची मंद गती … अर्धवट कामांमुळे नागरिकांना होतोय त्रास!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११जुलै) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील एम एस काटे चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून त्या ठिकाणी कचरा साठला असून अतिशय कुबट वास त्या ठिकाणी येत असून,पायी चालणारे,वाहनचालक,सर्वथरातील नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. तसेच या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे खचला आहे व मोठमोठे खड्डे पडले असून वारंवार वाहने घसरून अपघात होतात.

तसेच नागरिक जा ये करतात त्या भगवान महाश्वेरी चौकाचा नाम फलक आडवा अर्धवट स्थितीत कोसळला आहे, तेथील स्मार्ट सिटीचे काम अतिशय संथ गतीने सूरू आहे, जो भाग काम करून पूर्ण झाला आहे त्या ठिकाणचे कामाचे साहित्य हटविलेले नाही, त्यामुळे फुटपाथ असूनही नागरिकांना कसरत करत जावे लागते आणि हा भाग शहराच्या महापौर आणि प्रभाग अध्यक्ष यांच्या प्रभागात येतो हे महत्त्वाचे तरीही ठेकेदार मंद गतीने काम करत आहेत …

Google Ad

यावेळी मनसेचे प्रभाग अध्यक्ष प्रदीप गायकवाड म्हणाले, “या अर्धवट कामांबाबत ठेकेदारांना कितीही बोलले तरी त्याचे त्यांना काही वाटत नाही, निवेदने द्या, तोंडी सांगा, त्यांना लाज वाटत नाही, पदपथाची वाट लागली आहे, येथील प्रभागात महापौर ,सभापती यांचे वास्त्यव्य आहे हे अभियंत्यांच्या खीजगणतीत सुध्दा नाही, मोठमोठा पदभार आहे परंतु काडीची किंमत नाही अशी परिस्थीती झाली आहे, तरी आपली जबाबदारी ओळखा आणि या माजूरड्या अभियंत्यांना प्रतिनिधींनी भानावर आणावे आणि नागरिकांची या जाचातून सुटका करावी हीच अपेक्षा.

वास्तविक महापौरांना संपूर्ण शहरात लक्ष द्यावे लागते, त्यांच्या मागे असणारा कामाचा व्याप पाहता याही वयात त्या खूप धावपळ करतात त्यांनी ठेकेदारांना वारंवार या गोष्टी बाबत सूचना दिल्या आहेत, परंतु हे ठेकेदार तरीही या गोष्टी गंभीरपणे का घेत नाहीत हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. ठेकेदारांच्या या काम करण्याच्या पद्धतीने राजकारण तापत चाललंय त्यात सामान्य नागरिक भरडला जातोय हे नक्की!

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!