महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जानेवारी) : अंधश्रध्दा निर्मुलन उपक्रमांतर्गत, अनंत श्री विभूषित जगद्गगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गगुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ-नाणीजधाम (महाराष्ट्र) यांचा पूर्वनियोजित समस्या मार्गदर्शन सोहळा पिंपरी चिंचवड शहरात जय गणेश लॉन्स, भारत माता चौक, न्यू आळंदी देहू रोड, पुणे-नाशिक हायवे, मोशी, पिंपरी चिंचवड येथे आयोजित केला आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे व ती वृद्धिंगत करण्याचे कार्य जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान अतिशय व्यापकपणे करत आहेत.
▶️असा असेल कार्यक्रम :-
या कार्यक्रमाला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून भाविक भक्तांची गर्दी होणार आहे. दिनांक ०४ फेब्रुवारी २०२३ वार शनिवार रोजी सकाळी ९ वाजता जगद्गगुरुश्रीचे संतपीठावर आगमन होईल, स्वागत समारंभ होईल आणि लगेचच मार्गदर्शन होईल. सकाळी ११ नंतर दर्शन व समस्या मार्गदर्शन संध्याकाळ पर्यंत होईल. तसेच दिनांक ०५ फेब्रुवारी २०२३ वार रविवार रोजी मार्गदर्शन व दर्शन व समस्या मार्गदर्शन होईल.
या दोन्ही दिवसाचा जगद्गगुरुंचा कार्यक्रम संपन्न होत असताना दोन्हीही दिवस भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी जगद्गगुरुश्रीच्या अमृतवाणीचा व दर्शनाचा महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाग घ्यावा असे आवाहन जगद्गगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान उपपीठ पश्चिम महाराष्ट्र पिठाचे व्यवस्थापक मा. श्री. सुधांशू दीपक जाधव सरांनी केले आहे.
▶️जगद्गगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान लोकोपयोगी उपक्रम : कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, जसे कि, ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम, वैद्यकिय उपक्रम, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, आपतकालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे आयोजित केली जातात.
१. शैक्षणिक उपक्रम: गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शैक्षणिक साहित्य. २. वैदयकिय उपक्रम संस्थानाच्या वतीने ३७ अॅम्ब्युलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीजधाम येथे २४ तास मोफत हॉस्पिटल सेवा सुरू आहे. ३. कृषी विषयक उपक्रमः गोरगरीब शेतकऱ्यांना मोफत शेती बी बियाणे खते, औषधे, शेती अवजारे वाटप केले जाते. ४. आपत्कालीन मदत उपक्रम:- दुष्काळ पडल्यास संस्थानाच्या वतीने जनावरांना मोफत शेकडो टन चारा पुरविला जातो. अन्नधान्य वाटप केले जाते.
५. अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम :- अंगार, दोरे, धुपारे गंडा यावर विश्वास न ठेवता अध्यात्म, विज्ञान, व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे हे मार्गदर्शन केले जाते. ६. दुर्बल घटक मदत उपक्रम:- निराधार महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, शेळ्या, मेंढया, दुभत्या गाई, म्हशींचे वाटप केले जाते. अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…