Google Ad
Editor Choice

श्री संत तुकोबाराय विचारमाला ” : न्याहरी शुभप्रभात पुष्प -८७ … चिंता केल्याणे केवळ दुःख प्राप्त होते ; संचित कर्माचे फळ तर भोगावेच लागेल .

महाराष्ट्र 14 न्यूज, ( बुधवार, दि .२८ जुलै २०२१) : न्याहरी – भाग ८७ श्री संत तुकोबाराय विचारमाला वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।। ( अभंग क्र .११७८ वै.खांदारकर महा.गाथाभाष्य )

रामकृष्णहरि ! चिंता केल्याणे केवळ दुःख प्राप्त होते ; संचित कर्माचे फळ तर भोगावेच लागेल .

Google Ad

श्री तुकोबाराय म्हणतात वैभवांची सुखे नातळता अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ।

चिंता आपल्या वाट्याला आलेल्या सुखाचाही उपभोग घेवू देत नाही , तर मग आपल्या हातुन घडणार्या पापांचं काय करेल ? त्यातुन झोपेची गोळी सुध्दा आपली सुटका करू शकत नाही.म्हणुन आपलं संचित कर्म बलवान आणि पवित्र असावं .

नाही तर शेजारी म्हणती मरेणा का मेला । आणिला कंटाळा येणे आम्हा ।। जगाला सत्य आणि माणसातील भलेपणा आवडतो … जे झालं ते गंगेला मिळालं , त्याची चिंता करू नका.पण निदान या क्षणापासुन तरी आपण गेल्या नंतर कोणीतरी आपला फोटो घराच्या भिंतीवर लावावा असं काहीतरी करूया . तुका म्हणे आता सकळाचे सार । करावा व्यापार तरी ऐसा ।।

राष्ट्रिीय शिवकीर्तनकार
प्रा.डॉ. / गजानन महाराज वाव्हळ , पुणे
मो.९७६५३८७०४०

Google Ad

About the author

Maharashtra14 News

70 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!