महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जून) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा लवकरच., 7 दिवस चालणार महोत्सव, देश-विदेशातील मान्यवरांची हजेरी, कसा असणार कार्यक्रम?
पंतप्रधानांना डिसेंबर ते 26 जानेवारी 2024 पर्यंतच्या कार्यक्रमाची संभाव्य तारीख सांगितली जाईल. मात्र यात नक्की तारीख सांगता येणार नाही. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका तयार करतील.त्यावर महंत नृत्य गोपाल दास स्वाक्षरी करणार आहेत.
अयोध्या – बहुचर्चित व बहुप्रतिक्षित अयोध्यातील (Ayodhya) श्रीराम मंदिरात (Shri Ram Mandir) येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट प्राणप्रतिष्ठेचा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते करणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. या सोहळ्याची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. या प्रकरणी जाणकारांशी चर्चा सुरू असल्याची माहिती ट्रस्टच्या बैठकीनंतर सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. मात्र हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार असून, देश-विदेशातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं या सोहळ्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
देशभरातील साधु संत येणार
दरम्यान, या सोहळ्यासाठी देश-विदेशातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच देशभरात 7 दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी संत-धर्माचार्यांना आवाहन करण्यात येणार आहे. विविध संत, तसेच साधुना आमंत्रित केले जाणार आहे. तसेच देशातील प्रसिद्ध संत व साधु यांना प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरी करण्याची विनंती केली जाईल.
श्रीरामांची मूर्ती कशी असणार.
प्रभू श्रीरामांची मूर्ती आकर्षण असणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी रामललाच्या 3 मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रामलल्लाच्या डोक्यावर मुकुट व हातात धनुष्यबाण असेल. त्यासाठी कर्नाटकातील 2 काळे दगड आणि राजस्थानचे पांढरे संगमरवर वापरले जात आहेत. मात्र, यापैकी कोणती मूर्ती गर्भगृहासाठी निवडली जाईल, हे अद्याप निश्चित झाले नाही. तसेच अन्य राज्यातून देखील दगड व संगमरवरी यांचा विचार केला जात आहे.
सध्या कामाची काय स्थिती?
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव देशभरात 7 दिवस साजरा केला जाईल. राम मंदिराचा तळमजला व गर्भगृहाचे काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेची तयारी केली जाईल. पंतप्रधानांना डिसेंबर ते 26 जानेवारी 2024 पर्यंतच्या कार्यक्रमाची संभाव्य तारीख सांगितली जाईल. मात्र यात नक्की तारीख सांगता येणार नाही. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका तयार करतील. त्यावर महंत नृत्य गोपाल दास स्वाक्षरी करणार आहेत. ती पत्रिका पंतप्रधानांकडे पाठवली जाईल. चंपत राय म्हणाले की, तळमजल्याचे 85 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच अजून काम सुरु आहे. त्यामुळं डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल, असं चंपत राय यांनी सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…