Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथे श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संस्थेचा … १४ वा वर्धापन दिन व ज्येष्ठांचा आनंद सोहळा संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ ऑक्टोबर) : पिंपळे गुरव येथील श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संस्थेचा १४ वा वर्धापन दिन व ज्येष्ठांचा आनंद सोहळा आज रविवार दि . १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वा . जुनी शाळा क्र . ५४ , पिंपळे गुरव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ‘नगरसेवक शशिकांत आप्पा कदम’ यांची निवड कारण्यात अली. यावेळी दिप प्रज्वलन व विशेषांकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक शशिकांत कदम, माधवी राजापुरे, महेशदादा जगताप, सागर अंगोळकर, सिमाताई चौगुले,  उषा मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

Google Ad

यावेळी अनेक मान्यवरांचा तसेच पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्रध्दांजली विशेषांक प्रकाशन / अमृतमहोत्सवी जेष्ठांचा सत्कार / प्रमुख पाहुण्यांचे मनोगत आभार प्रदर्शन, जेष्ठ महिला भगिनींचा गीतांचा कार्यक्रम झाला.

जेष्ठ नागरिकांना एकत्र येता यावे, या वयात त्यांना विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ज्येष्ठांनी घराबाहेर पडणे टाळले होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक वेगळ्याच मानसिक अवस्थेत होते. त्यांचा विरंगुळा व मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने  ज्येष्ठांना दु:खाचा विसर पडून सुख अनुभवता यावे. याकरिता या संघाची स्थापना करण्यात आल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक  ‘शशिकांत आप्पा कदम’ यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक प्रकाश बंडेवार यांनी केले, यावेळी मल्हारराव येळवे ( अध्यक्ष ), बबनराव रावडे ( उपाध्यक्ष ), नागनाथ निळेकर ( कोषाध्यक्ष ), राजशेखर लद्दे ( संचालक ) श्रीमती अंजेलीना फ्रेन्सीस ( संचालिका ), जालंदर दाते, बाबुराव बिराजदार ( उपसचिव ), श्रीमती इंदुमती पवार ( संचालिका ), राजाराम व्हावळ ( संचालक ), श्रीमती लता गायकवाड ( संचालिका ), श्रीमती कांता दारात ( संचालिका ) श्रीनिवास पानसरे ( सचिव ), रमेश तांबे ( संचालक ) आदी जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!