Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सोमवारपासून पिंपरी चिंचवड शहरातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहाणार … संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मात्र कडक संचारबंदी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जून) : राज्य शासनाने दिलेल्या गाईडलाईननुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने काही निर्बंध शिथील केले आहेत. यानुसार पिंपरी चिंचवड शहारातील सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह सर्व दुकानांची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वाढविण्यात आली असून अन्य दुकाने मात्र शनिवार व रविवारी बंदच राहाणार आहेत. तर रेस्टॉरंट, बार, फुडकोर्टही सोमवारी ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच उद्याने, सलून, पीएमपीएमएल, व्यायामशाळा, सी.ए. व वकिलांची कार्यालये देखिल काही निर्बंधांसह सुरू करण्यास महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी परवानगी दिल्याने अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

येत्या सोमवारपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार असून दररोज संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मात्र कडक संचारंबदी राहाणार आहे. सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहाणार.
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने याच वेळेत सोमवार ते शुक्रवारपर्यंत उघडी राहातील. शनिवार व रविवार बंद ठेवण्यात येणार.

Google Ad

▶️काय सुरू काय बंद :-

* मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद राहाणार.
* रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के आसनक्षमतेने सुरू राहाणार.
यानंतर पार्सल सेवा सुरू राहील. शनिवार व रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सेवा देता येईल.
* उद्याने, मैदाने चालण्यासाठी व सायकलींगसाठी
सकाळी ५ ते सकाळी ९ यावेळेत सुरू राहातील.
* खाजगी कार्यालये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहातील.

* पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवेतील सर्व शासकिय कार्यालये
१०० टक्के क्षमतेने सुरू राहातील.
अन्य शासकिय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहातील.
* सर्व आउटडोअर स्पोर्टस
सकाळी ५ ते सकाळी ९ या वेळेत सुरू राहातील.
* सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत साजरे करता येतील.

* लग्न समारंभास ५० लोकांच्या
उपस्थितीचे बंधन राहील.
* अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्याच्याशी निगडीत कार्यक्रमास
जास्तीत जास्त २० लोकांची परवानगी राहील.
* विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्यसभा,
निवडणुका या ५० टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी राहील.
* शहरातील ज्या बांधकामांवर बाहेरून मजूर येतील त्यांना साईटवर ४ वाजेपर्यंत काम करण्यास परवानगी राहील.
साईटच्या ठिकाणी राहाणार्‍या मजुरांना वेळेचे बंधन नसेल.
* व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्र आसनक्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
याठिकाणी असलेले ए.सी.मात्र बंद ठेवावे लागणार आहेत.
* मालवाहतूक करणार्‍या वाहनांतील चालक व जास्तीत जास्त तीन जणांना प्रवास करता येईल.
* खाजगी वाहन, बस व रेल्वेने आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, ही वाहने कोरोना लेव्हल ५ म्हणून जाहीर केलेल्या क्षेत्रात थांबणार असतील तर त्यांना ई पास घ्यावा लागणार आहे.

* अत्यावश्यक उत्पादन सेवेतील सर्व कंपन्या पुर्ण क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत.
परंतू अन्य उत्पादक कंपन्या आणि संस्था ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत.
कामगारांना ने आण करण्याची सुविधा संबधित कंपनीने उपलब्ध करून द्यावी.
* सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३० जून पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
* मध्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील.
शनिवार व रविवारी होम डिलिव्हरी सुरू राहील.
* सर्व बँका, आर्थिक संस्था, ई कॉर्मस सेवा देणार्‍या संस्थांची कार्यालये सुरू राहाणार.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!