Google Ad
Editor Choice

शिवरत्न शंभूराजे वेल्फेअर संस्थे तर्फे … छत्रपती शंभूराजे जयंती साजरी न करता तृतीय पंथी समाजाला अन्नधान्य वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.१४ मे २०२१) : शिवरत्न शंभूराजे वेल्फेअर संस्थे तर्फे , छत्रपती शंभूराजे जयंती दर वर्षी उत्साहात साजरी केली जाते , परंतु मागील वर्षी व या वर्षी कोरोना महामारीमुळे जयंती उत्सव सार्वजनिक रित्या साजरा न करता घरगुती पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली . इतर खर्च वर्जित करून संस्थेने सामाजिक भान राखत सांगवी , पिंपळे गुरव , दापोडी या भागातील तृतीय पंथी समाजाला २०० किलो गहू , व २०० किलो तांदूळ वाटप केले.

तसेच १७० गरजू कुटूंबांना किराणा मालाचे वाटप केले . सोबतच दिघी मधील ज्ञानदीप बालगृह अनाथ आश्रम व सरस्वती अनाथ आश्रम दापोडी येथे ही गहू , तांदूळ , साखर , पोहे इत्यादी धान्य वाटप केले गेले . यावेळी सर्व शिव – शंभू भक्तांना विनंती करण्यात आली की, यंदा आपणही हे कर्तव्य पार पाडून माँ साहेब जिजाऊंना , शिवरायांना व शंभुराजांना मानवंदना द्यावी .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

83 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!