महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरात शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळ आयोजीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य साप्ताहिक आरती व शिववंदने साठी ऊदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
फुगेवाडी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक येथे दर रविवारी शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळ फुगेवाडी गावठाण तर्फ गेली नऊ वर्ष दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांची साप्ताहिक पुजा केली जाते.तसेच नऊ वर्षामध्ये परिवाराने साप्ताहिक पुजे सोबतच किल्लोत्सव स्पर्धा,प्रश्न मंजुषा,शिववंदना एक पर्व,प्रजासत्ताक दिना निमित्त सायकल रॅली, अशे नविन ऊपक्रम राबवले,अशातच नऊ वर्ष पुर्ण होऊ दहाव्या वर्षात पदार्पण करताना परिवाराने दोन ऊपक्रम राबवले एक श्रीमान योगी कादंबरी महावाचन सोहळा, नव्वद दिवस शिवतीर्थावर चाललेला हा वाचन सोहळा पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठा व प्रथम क्रमांकचा ऊपक्रम ठरला व दुसरा ऊपक्रम म्हणजे एक क्षण छत्रपतींसाठी या मध्ये गावातील पाच सदस्यांना बोलावून त्यांच्या हस्ते छत्रपतींच पुजन व आरती केली जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी या ऊपक्रमाला सुरवात झाली, या कार्यक्रमाच पुर्ण नियोजन हे श्री पुरषोत्तम वाखारे व श्री माऊली फुगे हे करतात त्याच बरोबर शिवराज पेठे,आरव गडेकर,सार्थक पवार,प्रसाद घुमे हे लहान सदस्य सूद्धा धडाडीने सहभाग घेतात,विशेष म्हणजे कोणाकडुन वर्गणी न घेता ऐच्छिक स्वरुपात येणार्या मदतीतच हे सर्व ऊपक्रम राबवले जातात अशा पवित्र शिवतीर्थाचे सातत्य व पावित्र्य जपणार्या शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळास आपण एकदा तरी आवश्य भेट द्या असे अवाहन केले जाते.