Google Ad
Editor Choice

शिवसेना प्रणित महाराष्ट्र वितरक सेनेच्या वतीने त्रिवेणीनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन …

महाराष्ट्र 14 न्यूज : शिवसेना प्रणीत महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे व उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महाराष्ट्र वितरक सेना पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या वतीने त्रीवेनीनगर शिवरकर चौक जरे कॉर्नर येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.

सकाळी १० ते २ या वेळेत डी वाय पाटील रक्तपेढी मार्फत रक्तदान पेढी मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २२ रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोनाच्या या संकट काळात मदतीचा हात दिला. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सरचिटणीस वैभव विक्रम छाजेड यांनी केले, कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र वितरक सेना पिंपरी चिंचवड शहर व भोसरी विधानसभा संघटक,श्री रावसाहेब चंद्रकांत थोरात यांनी केले.

Google Ad

यावेळी, सर्जेराव भोसले, नेताजी काशीद, संजय यादव, दादा ठाकरे, आबा पांचाळ, अशोक गायकवाड, संजय गाढवे, संजय रोकडे, मुकेश चौकेकर, बाळासाहेब नाखाडे, तेजेस चौधरी आदी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, संदीप आखाडे, संतोष गावडे,वैभव थोरात, चेतन सावंत,त्रिंबक पटाईत, तानाजी गायकवाड ,विश्वास लिंबोरे,निलेश गाढवे,ऋषिकेश डोरले संगमेश्वर मुळे ,बाळासाहेब बांदल आदीनी परिश्रम घेतले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!