Google Ad
Editor Choice

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे ज्येष्ठ बंधू … थेरगाव येथील मा. उपसरपंच व थेरगावचे पहिले नगरसेवक यांचे कोरोनामुळे निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१जुलै) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती हिरामण बारणे यांचे कोरोनामुळे शनिवारी (दि.३१) निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

थेरगावच्या उपसरपंचपदापासून हिरामण बारणे यांनी समाजकार्याला सुरुवात केली. महापालिकेच्या स्थापनेनंतर १९८६ च्या पहिल्या निवडणुकीत थेरगावमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

Google Ad

१९८८ – ८९ मध्ये त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणून ही त्यांनी काम केले. त्याचबरोबर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. थेरगावसारख्या अविकसित भागात नगरसेवक म्हणून त्यांनी मोठे काम केले.

पाण्याची योजना, रस्ते, वीज अशी विविध कामे केली. प्राधिकरणग्रस्त थेरगाव भागात नगरसेवक म्हणून सर्वाधिक विकास कामे हिरामण बारणे यांनी केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. शिवसेना नगरसेवक निलेश बारणे, उद्योजक महेश बारणे यांचे ते वडील होत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

24 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!