Google Ad
Uncategorized

नको नारळ.. नको कपबशी.. दोघंही एकाच माळेचे मणी.. आता आपला टीव्ही..च बरा” म्हणत पिंपरी चिंचवड महापालिका सेवकांच्या पतसंस्था निवडणुकीत शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचने घेतली प्रचारात आघाडी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पंतसस्थेची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली आहे. या पतसंस्थेचे मतदान मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत मनपा मुख्य कार्यालयात होणार आहे. या निवडणुकीत शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या सर्व उमेदवारांना सभासदांचा भरघोष पाठिंबा मिळू लागला आहे. पतसंस्था सभासदांनी निवडणुक हातात घेवून कर्मचा-यांच्या भविष्यासाठी नवीन चेह-यांना संधी देण्याचा इरादा पक्का केला आहे.

“नको नारळ.. नको कपबशी.. दोघंही एकाच माळेचे मणी.. आता आपला टीव्ही..च बरा” म्हणत पिंपरी चिंचवड महापालिका सेवक पतसंस्था सभासदांनी एकच निर्धार करत यंदा परिवर्तन करण्याची वज्रमुठ बांधली आहे. महापालिका सेवकांच्या पतसंस्था निवडणुकीत शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचने प्रचारात आघाडी घेतली असून पॅनेलमधील सर्व तरुण उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पक्का केला आहे. ही निवडणुक सभासदांनी हातात घेत पतसंस्थेचे लचके तोडणा-या मनमानी, एकाधिकारशाही वृत्तीला आणि स्वार्थी, पक्षीय राजकारण करणा-यांना खड्यासारखे बाजूला करुन यंदा परिवर्तन घडवतील, असा विश्वास पॅनेल प्रमुख संजय ऊर्फ बापू जगदाळे यांनी व्यक्त केला.

Google Ad

महापालिका सेवकांच्या पतंसस्थेत कर्ज पुरवठा करताना सत्ताधा-यांकडून पक्षपातीपणा करणे, कर्जाची अडवणूक करुन हेलपाटे मारावे लागणे, काही सभासदांना कमी कर्ज पुरवठा करणे, असा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. मात्र, प्रत्येक सभासदाला आम्ही विना जामिन.. मागेल त्याला कर्ज योजना राबविणार आहे. आवश्यक तेवढे कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक कर्जाची मर्यादा वाढविणार आहे, मुलींच्या लग्न कार्यालयास सुकन्या कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात येईल. याशिवाय पतसंस्थेचा राज्यात लौकीक वाढवून सर्व सेवा-सुविधा आॅनलाईन करण्यात येतील, त्यामुळे सभासदांनो.. आता विचार करा.. शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या उमेदवारांना मतदान करुन एक संधी द्या, त्या संधी आम्ही नक्की सोनं करु, असा विश्वास पॅनेल प्रमुख संजय ऊर्फ बापू जगदाळे यांनी व्यक्त केले.

पॅनेल प्रमुख संजय जगदाळे म्हणाले की, महापालिका सेवक पतसंस्था ही आपल्या सभासदांच्या भागभांडवलावर उभी राहिली आहे. त्या पतसंस्थेचे आपण सर्वजण मालक आहात. पण सभासदांपेक्षा तज्ञ संचालकाने एकतर्फी कारभार चालविला आहे. पतसंस्थेतील कारभार कित्येक वर्ष सत्ताधा-यांच्या ताब्यात असल्याने मनमानी धोरण चालविले आहे. सभासदापेक्षा संचालकांनी मर्जीप्रमाणे कामकाज केल्याने काही सभासदांना कर्जापासून वंचित राहावे लागले आहे.

असे आहेत, शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे शिलेदार :

सर्वसाधारण गटात ज्ञानेश्वर (अविनाश) इंगवले, परशुराम कदम, मनिष कुदळे, संतोष कुदळे, शंतनु कांबळे, बाळासाहेब कापसे, संजय जगदाळे, दत्तात्रय दुधे, इस्माईल शेख, महिला गटात माया वाकडे, अनुसूचित जाती-जमाती गटात प्रविण उघडे, इतर मागास वर्ग गटात हेमंत जाधव, भटक्या विमुक्त जाती गटात महेश कोळी हे उमेदवार आपले आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!