Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pune District

Shirur : शिरूर तालुक्यातील एका गावात भर रस्त्यात दिवसाढवळ्या खुन … आरोपी एका तासात जेरबंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६जून) : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येेथे भर रस्त्यात दिवसाढवळ्या खुनाचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणातील आरोपीला एक तासांच्या आतच शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.५ रोजी दुपारी ०१:४५ च्या सुमारास तळेगाव ढमढेरे गावाच्या हद्दीत तळेगाव- न्हावरा रोडच्या बाजूस शासकीय गोडाऊन जवळ प्रतिभा दूध डेअरी समोर एका अनोळखी व्यक्तीने डोक्यावर व कपाळावर दगडाने मारून हत्या केल्याबाबतची फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून अभिनव देशमुख पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक व मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे राहुल धस,उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड विभाग यांनी तात्काळ गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Google Ad

शिक्रापूर पोलिसांनी या कामी तात्काळ तपास पथके नेमण्यात आली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित या घटनेतील संशयित आरोपी हरीश सुधाकर काळे ( वय २५ वर्ष ,रा. खंडोबाची आळी तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे) याला ताब्यात घेतले. पोलीसांनी या वेळी अधिक चौकशी केली असता आरोपीने सदरचा गुन्हा अनैतिक संबंधाच्या कारणावरून केला असल्याचे पोलिसांना सांगितले व यातूनच नवनाथ संपत चौधरी ( रा. पाबळ,ता.शिरुर, जि. पुणे) याचा दगडाने मारून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली.

हा तपास शिक्रापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे,शिवराम खाडे, राजेश माळी,पो.हवा. पंडित मांजरे, जितेंद्र पानसरे,दत्तात्रय शिंदे,अजिनाथ शिंदे,पो.ना.अमोल चव्हाण, अमोल दांडगे,श्रीमंत होनमाने, संतोष शिंदे, पो. कॉ. महेंद्र पाटील, भरत कोळी, शिवाजी चिताळे, राहुल वाघमोडे, जयराज देवकर, लक्ष्मण शिरसकर यांनी केला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी करीत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!