महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मे) : पुणे जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. तर या बैठकीला अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली आहे. मात्र, त्यांनी कामकाजात कोणत्याही प्रकारचा सहभाग नोंदविला नाही.
पवार हे समितीच्या बैठकीला वेळेआधीच विधान भवन येथे हजर झाले. त्यांच्यामुळे समितीची बैठक वेळेआधीच पंधरा मिनिटे म्हणजेच पाऊण वाजता सुरू झाली. पवार यांना बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शेजारी स्थान देण्यात आले होते. सव्वा दोन तास बैठक संपेपर्यंत पवार बैठकीत उपस्थित होते, त्यानंतर पत्रकारांशी न बोलताच ते निघून गेले. बैठकीत पवार यांना बोलण्याबाबत विनंती केली. मात्र, मी काही बोलण्यासाठी नव्हे, तर बैठकीचे कामकाज कसे चालते, हे पाहण्यासाठी आल्याचे बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, मोरया गोसावी देवस्थान परिसर विकासासाठी निधी देण्यात येईल.
तसेच जिल्हा परिषद शाळा, रस्ते आणि अंगणवाड्यांच्या बांधकामाबाबत स्वतंत्र बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात येईल. शाळांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शाळांमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल याची दक्षता घ्यावी, असे पाटील यांनी सांगितले.
पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावे लक्षात घेता तेथील सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलाला वाहनांसाठी आवश्यक निधी देण्यात येत आहे. पोलिसांनी अद्ययावत साहित्याची मागणी केल्यास अधिकचा निधी देण्यात येईल, तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
इंद्रायणी मेडिसिटीबाबत आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधीतून कामांचे नियोजन वेळेवर करावे. दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी यासाठी महावितरणने आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप विजयी झाले आहेत.…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…