महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहातच कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करत त्यांनी पवारांच्या निवृत्तीला तीव्र विरोध केला. व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याबाबतची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २) केली आहे. शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केल्याने सभागृहातच कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला, अनेक कार्यकर्त्यांना तर अश्रू अनावर झाले होते.
कमिटीमध्ये आपलेच लोक असणार आहेत. कमिटीमध्ये चर्चा करत असताना कार्यकर्त्यांची भावनिक साद लक्षात घेतली जाईल. समिती ठरवेल तो निर्णय शरद पवार यांना मान्य असेल, असे अजित पवार यांनी यावेळी सागितले.