Categories: Editor Choice

शरद पवार आणि अजितदादांनी शिवसेना फोडली … आरोप करत आणखी काय म्हणाले, रामदास कदम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जुलै) : शरद पवार यांनी शिवसेनेचे लोक फोडले. हे सातत्याने होत आहे. प्रत्येक आमदार उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याच शरद पवार यांच्यावरील प्रेम कमी होत नाही. आज एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले नसते तर शरद पवार आणि अजित पवार यांनी पक्ष संपवला असता, असा आरोप रामदास कदम यांनी केला. रामदास कदम यांनी आपल्या शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांनी 52 वर्ष साठवलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

यावेळी कदम यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर आरोप केला. शरद पवार यांनी शेवटी डाव साधला. उद्धव ठाकरे हे भोळे आहे. शरद पवारांचा डाव उद्धव ठाकरेंना कळला नाही. आमचा पक्ष हा शरद पवारांनी फोडला आहे. शरद पवार यांनी शिवसेनेचे लोक फोडले. हे सातत्याने होत आहे. प्रत्येक आमदार उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याच शरद पवार यांच्यावरील प्रेम कमी होत नाही.

आज एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले नसते तर शरद पवार आणि अजित पवार यांनी पक्ष संपवला असता, असा आरोपही कदम यांनी केला. ‘आता आम्ही अनिल परब यांचा फोटो लावायचा का केबिनमध्ये, इतका मोठा वकील झाला आहे का तो, 1993 ची दंगल आम्ही पाहिली होती. आमची कसली हकालपट्टी करताय, तुमच्या बाजूला बसलेले पक्षद्रोही आहे, त्यांच्यावर कारवाई करा. अनिल पब असं म्हणत कदम यांनी संजय राऊ यांच्यावर टीका केली.

मी नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मग हकालपट्टी किती जणांची करणार आहेत. आमदार आणि खासदार फुटले आहे. तरीही आमची हकालपट्टी केली जात आहे, उद्धवसाहेब किती जणांची हकालपट्टी करणार आहात.

कधी फोन करून बोलावलं का, या रामदासभाई आपण बोलूया, असं म्हणत कदम यांना अश्रू अनावर झाले. 52 वर्ष काम करणारा नेता पक्षातून राजीनामा का देत आहे, याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. त्यांनी मला एक फोन लावून विचारलं पाहिजे होतं, रामदास भाई या इथं बसून चर्चा करूया, ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, हा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष नाही, असं म्हणत रामदास कदम ढसाढसा रडले आम्ही भगवा कधी सोडणार नाही. बेईमानी आमच्या गटामध्ये नाही.

जोपर्यंत उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडत नाही. तोपर्यंत कुणीही परत येणार नाही. आदित्य ठाकरे यांना साहेब म्हणावं लागत आहे. कारण ते ठाकरे आहे, मातोश्रीमधले आहे.

आदित्य ठाकरेंची ही भाषा, इतर नेत्यांच्या ही भाषा आम्ही समजू शकतो. पण आदित्यही बोलायला लागले. आदित्य ठाकरे हे दीड वर्ष माझ्या केबिनमध्ये येऊन बसायचे. मी परिवहन मंत्री होतो.

मला म्हणायचे, या अधिकाऱ्यांना बोलावा, सचिवांना बोलावून बैठक बोलावं असं सांगायचे. बाहेरच्या माणसाला तसे अधिकार नसतात पण तरीही मी बैठका लावल्यात. प्लास्टिक बंदी मी केली. पण श्रेय हे आदित्य ठाकरे यांना दिलं.

मातोश्री मोठी झाली पाहिजे म्हणून मी ही क्रेडीट दिलं. कालपर्यंत काका काका म्हणणारे आदित्य ठाकरेंनी माझंच पर्यावरण खातं घेतलं, अशी नाराजीही कदम यांनी उघडपणे बोलून दाखवली. ‘बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, मी कधीच किरीट सोमय्यांच्या संपर्कात आलो नाही. कधीच माझा त्यांच्या संपर्क नव्हता.

कदम हा पाठीत खंजीर खुपसणारा माणूस नाही. समोर येणार कदम आहे. विनायक राऊत सारख्या माणसाने माझ्याविरोधात कटकारस्थान रचले. तुम्ही आज माझ्यावर बोलताय, तुमची औकात आहे तरी का?

राणे गेल्यावर कुणी केला होता संघर्ष, असा थेट आरोपच कदम यांनी केला. मी आता बाहेर पडून राज्यभरात दौरे करणार आहे. जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार आहे. त्या मतदारसंघात जाणार आहे.

पण शिवसेना संपू देणार नाही. मी राजीनामा दिला मला दुःख आहे. तुम्ही माझ्या मुलाच्या राजकीय आयुष्य संपवायला निघायला. मी उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटलो होतो.

गुवाहाटीला सगळे असतानाही मी प्रयत्न केले. पण शरद पवार मातोश्रीला गेले आणि गुरुकिल्ली फिरवली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सगळे पुन्हा यायला तयार होते पण हे लोक रेडे, प्रेत म्हणतात मग सगळे जण पुन्हा थांबले, असा गौप्यस्फोटही कदम यांनी केला. आज शब्द देतो, शिवसेना कधी संपू देणार नाही.

शिवसेना कशी संपेल, असं काही लोकांना वाटत आहे. पण उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा दोन पावलं मागे घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 32 किल्ले दिले होते. त्यानंतर आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर 40 किल्ले घेतले होते. त्यामुळे परिस्थितीत पाहून निर्णय घ्यावे लागेल, असं आवाहनही कदम यांनी केलं.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

14 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago