Categories: Uncategorized

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भाजपच्या वतीनं आज सेवा दिवस म्हणून साजरा केला जाणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ जुलै) : इर्सालवाडी येथे काल मोठी दुर्घटना घडली ज्यात लोकांचा मृत्यू झाला. सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू आहे. मृतांच्या नातेवाइकांच्या दुःखात भाजप परिवार सहभागी आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलंही सेलिब्रेशन केलं जाणार नाही. राज्यात काही भागात पूरस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं उद्या सेवा दिवस साजरा केला जाणार आहे

• भारतीय परंपरेमध्ये ‘सेवा’ ही वृत्ती, भावना

तुकाराम महाराज म्हणतात
‘मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा’

• ‘सेवा कोणाची घडावी? शेवटचा माणूस. दासांचाही दास. त्याची सेवा माझ्या हातून घडली म्हणजे ईश्वराचे खरे पूजन झाले.

• अर्थात शेवटचा माणूस आणि हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नेहमी सांगतात की शेवटच्या माणसाचा विकास हे आपले ध्येय आहे.

• सरकारपातळीवर अनेक योजनांच्या माध्यमातून सेवा घडत असते.

• तथापि, भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, शनिवार, दि.22 जुलै रोजी राज्यभर ” सेवादिवस ” साजरा करण्याचा संकल्प भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे.

• सेवादिवसाच्या निमित्ताने भाजपाचे राज्यभरातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आप आपल्या कार्यक्षेत्रात सेवा उपक्रम राबवतील.यामध्ये
• राज्यभर आरोग्य शिबीरे घेतली जातील.
• कृत्रिम अवयवांचे वितरण
• नेत्रदांनाचे अर्ज भरून घेतले जातील.
• गरिबांना चष्मा वाटप
• अवयवदान मोहिमेला मदत करण्यासाठी सरकारी रुग्णालयात अवयवदानाच्या मान्यतेचे अर्ज भरून घेतले जातील.
• रक्तदान शिबीरे
• महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर
• मधुमेहींसाठी रक्ततपासणी शिबीर
• वृद्धाश्रमात असलेल्या ज्येष्ठासाठी आरोग्य शिबीर,
कानाची तपासणी. श्रवण यंत्राचे वितरण.
• वृद्धाश्रमात असलेल्या ज्येष्ठासाठी व्हीलचेअर, काठ्या आणि पुस्तकांचे वाटप.
• शालेय साहित्याचे वितरण
• गरजूना रेनकोट व छत्री वाटप
———–
भाजप ” रुग्णमित्र ” सेवाभाव अभियान : –

सरकारी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाच्या कामी मदत व्हावी, म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ” रुग्ण मित्र ” म्हणून सेवाभावी पद्धतीने सेवा देईल. हे अभियान सेवभावी वृत्तीने चालविले जाईल.
• या अभियानात सेवा करणारा कार्यकर्ता कोणताही मोबदला न घेता दिवसातून पाच तास सेवा करेल.
• हा रुग्णमित्र रुग्णालयात जेव्हा असेल, त्यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थिसपनाशी समन्वय ठेवून प्रशासकीय मदत करेल.
• आरोग्य योजनासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत. मुख्यमंत्री, पंतप्रधान वैद्यकीय निधीसाठी मदत

—————
देवेंद्र प्रबोधनमाला :-

दर महिन्याच्या 22 तारखेला प्रबोधन करणारी कीर्तने, व्याख्याने, प्रवचन आयोजित करण्यात येतील.
विद्यार्थी, शेतकरी, महिला यांच्यासाठी मार्गदर्शन करणारी तसेच तरुणांना रोजगार विषयक मार्गदर्शन करणारी अभ्यासक, तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने
या प्रबोधनमालेत होतील.
याबाबतचे नियोजन शहरी व मंडळ स्तरावर तेथील अध्यक्ष करतील.
प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून मार्गदर्शक पाठविले जातील.
प्रबोधनमालेचा हा उपक्रम, 22 ऑगस्ट 2023 पासून दरमहा विविध ठिकाणी राबविला जाईल.

Maharashtra14 News

Recent Posts

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…

2 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

2 weeks ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

3 weeks ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

3 weeks ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

2 months ago