Categories: Uncategorized

पुण्यातील ऐश्वर्य कट्ट्यावर अनोख्या पद्धतीने साजरी झाली संवेदना जागवणारी दिवाळी!!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ऑक्टोबर) : दिवाळीचा पहिला दिवस सुरू होतो तोच शुभेच्छांचा वर्षाव आणि फराळाचा आनंद घेत… ऐश्वर्य कट्ट्यावर मात्र दिवाळीचा आनंद थोड्या वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने साजरा झाला.

आप्पा रेणुसे यांच्या ऐश्वर्य कट्ट्याच्या वतीने आणि ऍड. दिलीप जगताप यांच्या मातोश्री स्व. लक्ष्मीबाई जगताप यांच्या स्मरणार्थ हेलपिंग हॅन्ड सोशल फाउंडेशन (आसरा हक्काचा निवारा) या संस्थेमध्ये असणाऱ्या अनाथ, वयोवृद्ध लोकांची भेट घेऊन त्यांच्या समवेत काही क्षण घालवून संवेदना जागवणारी दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीची खऱ्या अर्थाने वेगळी सुरुवात झाली अशी कट्ट्यावरील सर्वांचीच भावना झाली.

या संस्थेच्या प्रमुख स्वातीताई डिंबळे म्हणजे एक चैतन्यशील आणि धडाडीचे व्यक्तिमत्व. आजच्या घडीला समाजाने सोडून दिलेल्या आणि मानसिक अस्वस्थतेतून जाणाऱ्या 32 लोकांचा सांभाळ त्या आईच्या मायेने करीत आहेत.

संस्थेची स्थापना केल्यापासून किती अडचणीतून हा प्रवास झाला हे स्वातीताईंनी सांगितलेच पण त्याचवेळी एकेका व्यक्तीला किती विपन्नावस्थेतून इथे आणले त्याच्या हृदयद्रावक कहाण्या त्यांनी सांगितल्या.. त्यांचे मनोगत ऐकून आजच्या व्यावहारिक होत चाललेल्या जगात त्या शब्दशः देवाचे काम करीत आहेत अशीच सर्वांची भावना झाली.. सर्वजण अक्षरशः निःशब्द झाले आणि साऱ्यांचीच मने हेलावून गेली.

सर्वांना फराळाचे वाटप करून त्यांना भविष्यात आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही कट्ट्यावरील सदस्यांनी दिली. यावेळी संस्थेत राहत असलेल्या तीन चिमुकल्यानी हीच आमुची प्रार्थना हे गीत सुरेख रीतीने गायले आणि एक नृत्यही सादर केले. सर्वांना आग्रहाने ‘परत या’ सांगायला ही मुलं विसरली नाहीत.

दिवाळीची ही आगळीवेगळी सुरुवात करताना आप्पा रेणुसे याच्या सोबत विलासराव भणगे, पराग पोतदार, सर्जेराव शिळीमकर, शंकरराव कडू, पांडुरंग मरगजे, युवराज रेणुसे, सचिन डिंबळे, नेमीचंद सोळंकी, मधुकर कोंढरे, वाबसाहेब मासाळ पाटील, अॅड, कुंडलिक येप्रे, संदिप कदम, शरद कुडले, मंगेश साळुंके, रोहित रेणुसे, शिरीष चव्हाण, मनोज तोडकर, मयुर संचेती, अभिराज रेणुसे, राजू बोलदाणे आणि अप्पा रेणुसे मित्र परिवार उपस्थित होता…

Maharashtra14 News

Recent Posts

सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…

3 days ago

नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेजचा दहावी चा निकाल शंभर टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…

4 days ago

माॅक ड्रील- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…

1 week ago

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणामुळे मिळालं? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…

2 weeks ago