Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुणे शहरात एकाच परिसरात तीन वेगवेगळ्या आत्महत्येच्या घटनांमुळे खळबळ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८मे) : पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना समोर आल्या आहेत. 35 वर्षीय वाहनचालकाने बेरोजगारीतून आयुष्य संपवलं. चाळीस वर्षीय व्यक्तीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. राजीव गांधी उद्यानासमोर एकाने आपल्या आयुष्याची अखेर केली. 35 वर्षीय निरंजन बाळकृष्ण साळुंखे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो वंडर सिटीजवळ वर्धापन बिल्डिंगमध्ये राहत होता.

निरंजन हा वाहन चालक म्हणून काम करत होता. मात्र गेल्या महिन्यांपासून त्याच्याकडे रोजगार नव्हता. मित्र निरंजनला दररोज जेवणाचा डबा आणून देत असे. सोमवारी दुपारी डबा घेऊन आला असता त्याला निरंजनने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्याने उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Google Ad

▶️40 वर्षीय व्यक्तीनेही आयुष्य संपवलं
दुसरीकडे, चाळीस वर्षीय पोपट पांडुरंग सलगर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो सुखसागर नगर परिसरातील रहिवासी होती. त्याची मुलं गावाला, तर पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

▶️उद्यानासमोर तरुणाचा गळफास
राजीव गांधी उद्यानासमोर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेही उघड झाले. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी, मोबाईल न सापडल्याने या व्यक्तीची ओखळ पटू शकली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. एकाच परिसरात तीन वेगवेगळ्या आत्महत्येच्या घटनांमुळे खळबळ उडाली असून सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

▶️पत्नी-मुलाची हत्या करुन तरुणाची आत्महत्या
दरम्यान, 28 वर्षीय पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना गेल्याच आठवड्यात समोर आली होती. बेरोजगारीला कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती.

हनुमंत शिंदे असं पत्नी-मुलाची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे. हनुमंतने 28 वर्षीय पत्नी प्रज्ञा शिंदे आणि एक वर्षांचा मुलगा शिवतेज शिंदे यांची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर हनुमंतने गळफास घेत स्वतःचंही आयुष्य संपवलं. यामुळे शिंदे कुटुंब राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

28 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!