महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ ,ऑक्टोबर) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले 40 वर्ष सांगवी भागात स्थायिक असलेले श्री.नारायणराव शंकर भागवत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसी व बारा बलुतेदार समाजासाठी अहोरात्र झटणारे आणि शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचाराचे पाईक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वासर्वे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराला अधीन राहून समाजकार्य गेले 40 वर्ष करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 1999 पासून एक पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत असणारे, पवार साहेबांनी गेले कित्येक वर्ष समाज कार्य करत असताना विविध समाजातील घटकांना न्याय द्यायचे काम सतत केलेले आहे.
वरिष्ठ उपाध्यक्ष ओबीसी सेल पिंपरी चिंचवड शहर पद स्वीकारताना नारायण भागवत म्हणाले “खऱ्या अर्थाने ज्या ज्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पवार साहेबांनी मोठे केले त्यांनी त्यांच्या या वयामध्ये धोका देऊन पक्षविरोधी, विचाराविरोधी, काम करण्याची भूमिका स्वीकारल्यामुळे आज आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पुन्हा पवार साहेबांच्या बरोबरीने काळाची गरज ओळखून काम करावं लागणार आहे. पवार साहेब यांना कुठल्याही पक्षाचे किंवा चिन्हाची गरज नाही साहेब ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणाहून नवीन कार्यकर्ते जोमाने तयार होतात कारण साहेब स्वतः एक चालतं बोलतं कार्यकर्ते घडवणारे विद्यापीठ आहे. त्याच आम्ही येत्या काळात नक्कीच सोनं करू. ओबीसी व बारा बलुतेदारांसाठी संपूर्ण भारतामध्ये प्रथम एकमेव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मंडल आयोग लागू केला आहे. त्याचंच ऋण फेडण्यासाठी आज माझ्यासारख्या ७० वर्षाच्या तरुण कार्यकर्त्याला 83 वर्षाच्या तरुणा बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याची वेळ आली आहे . येत्या काळात पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून पक्ष वाढीसाठी जोमाने काम करेल.
समाजाच्या साठी न्याय व हक्कासाठी पवार साहेबांचा विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम यापुढे मी करत राहील. आमचे ओबीसी नेते शहराध्यक्ष भाई विशाल जाधव ह्यांचं कार्य खूप चांगल्या प्रकारे असल्या कारणामुळे मी स्वतःहून त्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी मागणी केली व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता माझ्यावर ही जबाबदारी सोपवली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”
सांगवी येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी पक्षाचे सर्वासर्वे शरदचंद्रजी पवार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या विचारांचे व श्री राज राजापूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष भाई विशाल जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सोबत महेश भागवत संतोष कदम व इतर ओबीसी समाजाचे मान्यवर होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25ऑगस्ट :-- पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी ठरला आहे. पिंपरी…
अजित पवारांनी आज चौफेर फटकेबाजी केली. मी बीडचा पालकमंत्री आहे. तिथले नागरिक म्हणतात तुम्ही अधून-…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ ऑगस्ट २०२५ : चऱ्होली येथील वडमुखवाडी परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज…