महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ मे) : कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले अशा महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने उमेद जागर उपक्रम राबविण्यात येतो.
याअंतर्गत सिम्बॉयसिस ओपन स्किल युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत बेसिक व ॲडव्हान्स शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. व अश्या महीलांचे बचत गट स्थापन करण्यात आले आहे . तसेच थेरगाव येथे शिलाई केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी कोविड योध्दा महिला बचत गटातील महिला काम करीत आहेत. सद्यस्थितीत जुन्या कपड्यांपासून पर्यावरणपूरक कापडी पिशव्या बनवण्याचे काम चालू आहे.
तथापि या महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने सदर बचत गटासोबत सोबत ३ वर्षे करारावर सहा महिन्यांसाठी ५० हजार दरमहा याप्रमाणे खेळते भांडवल देण्यात येणार आहे. तसेच बचत गटाला शिलाई कामकाजाच्या ऑर्डर देण्यासाठी महापालिका मदत करणार आहे. त्यापुढील भांडवल व खर्च महिलांनी करावयाचा आहे.
महापालिकेकडून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते कोविड योध्दा बचत गट क्रमांक १ च्या अध्यक्षा सुवर्णा भालेराव,रंजना शेंडे,लता बवले, मीना चौधरी, कविता साबळे,,स्मिता अंकुशे, मंगल लोंढे यांना आज आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, समाजसेवक संतोषी चोरगे, समूह संघटक रेश्मा पाटील, वैशाली खरात, मनोज मरगडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…
महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानी…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित…
'महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31ऑगस्ट :- या सुखानो या' म्हणत टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकलेली आणि आपल्या अभिनय…