माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षकांच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांना १० दिवस करणार अन्नदान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ मे) : बसवेश्वर जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती व रमजान ईद निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमतः आज माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाच्या सर्व क्रीडा शिक्षकांनी मिळून आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी ,अशा ठिकणच्या रेल्वे स्टेशन वर जाऊन एकूण दहा दिवस अन्नदान करण्याचा मदतीचा हात पुढे केला आहे.

सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊन असल्यामुळे अनेक रेल्वेस्टेशनवर गरिबांची उपासमार होत आहे. त्याकरता महामंडळाच्या माध्यमातून एक वेळेचे जेवण त्यांना पुरवावे अशी संकल्प संकल्पना महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर व महामंडळाचे अध्यक्ष माननीय फिरोज शेख यांनी मांडली या उपक्रमात सर्व शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला आणि आज (१४ मे) रोजी आकुर्डी रेल्वे स्थानक येथे अन्नदान करण्यात आले.

किमान ५०० लोकांना मंडळाच्या वतीने दिनांक १४ मे ते २४ मे २९२१ पर्यत साय ६.०० वाजता अन्नदान करण्यात येणार असून यासाठी महामंडळाचे सचिव महादेव पफाळ ,हनमंत सुतार, सुजाता चव्हाण, रफिक इनामदार, चंद्रकांत पाटील, किर्ती मोटे, अर्चना सावंत ,उमा काळे,

राजू माळी , पोपट माने ,विष्णुपंत पाटील, बाळासाहेब हेगडे ,निळकंट कांबळे, प्रतिमा शितोळे, हर्षदा नळकांडे ,राम मुदगल ,आशिष मालुसरे ,राजा प्रसाद , शिदे सर रंणखांबे सर, मनीषा पाटील,अजित गायकवाड, रवि पिल्ले, निखिल पवार आदी क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

5 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

12 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago