Google Ad
Uncategorized

पोटनिवडणूकीकरिता सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थींना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.१८ फेब्रुवारी) : दि. २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थींना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण आज देण्यात आले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या प्रशिक्षण सत्रामध्ये निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांच्या विशेष उपस्थितीत महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी आणि चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षणार्थींना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाचे एकुण ३ टप्पे करण्यात आले असून पहिला टप्पा दि.१२ फेब्रुवारी पार पडला आहे.

Google Ad

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, निवडणूक सहायक अधिकारी प्रशांत शिंपी, थाॅमस नरोन्हा, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, भेल इलेक्ट्रॉनीक्सचे तज्ज्ञ अधिकारी गणेश कुशवाह आदी उपस्थित होते.

दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणूक विषयक सर्व प्रकिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे वेळोवेळी प्रशिक्षण देले जात आहे. आज पार पडलेल्या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रकिया सुरु होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधीं (Polling Agents ) समोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे. आदींबाबत तसेच मॉक पोल प्रकीयेच्या सुरुवातीपासून ते प्रकिया संपन्न होईपर्यंतची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली.

महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी प्रशिक्षण सहज, सोप्या भाषेत प्रशिक्षण दिले. यामध्ये यांनी त्यांना प्रत्यक्ष निवडणूक विषयक कामकाजात आलेले अनुभव सांगितले. निवडणूक विषयक कामकाजाचे गांभीर्य सर्वांना समजून सांगितले. सेक्टर अधिकारी किरण अंदूरे यांनी विविध रकान्यांची तपशीलवार माहिती दिली. मतदानाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती कशा पध्दतीने भरावी याचे संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर बाबी स्पष्ट करून सांगितल्या. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी सर्व अधिकारी कर्मचा-यांनी व्यवस्थितपणे पार पाडावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिले.

चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत नावे असलेल्या कर्मचारी अधिका-यांसाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे दुसर्‍या प्रशिक्षणाच्या दिवशी मतदान सुविधा कक्ष सुरू करण्यात आला होता. टपाली मतदानासाठी आवश्यक असणारे फॉर्म वितरण आणि स्वीकृतीची सोय येथे करण्यात आली होती. शिवाय याठिकाणी टपाली मतदान कक्ष उभारण्यात आला होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!