महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेंतर्गत अर्थशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी)पदवीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य संतोष नानासाहेब ढोरे यांनी प्रबंध सादर केला होता. त्यांनी ‘पुणे व नाशिक जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांकाचा तुलनात्मक आर्थिक अभ्यास’ या विषयावर अध्ययनाचे काम पूर्ण केले. नुकतीच त्यांना विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान केली.
त्यांना डॉ.शिवाजीराव ढगे व डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांनी मार्गदर्शन केले.त्यांचे आमदार शंकरशेठ जगताप , प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर ,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे ,अधिष्ठाता डॉ.विजय खरे, उपकुलसचिव डॉ.मुंजाजी रासवे यांनी अभिनंदन केले.
