Google Ad
Editor Choice

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) निवडणूक … महाविकास आघाडी एकत्रित लढविणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ नोव्हेंबर) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार आहे. सहा जागा राष्ट्रवादी, तर शिवसेना चार जागा लढविणार आहे. पाच वर्षात काही सदस्यांनी केलेला भ्रष्टाचार आम्ही पुढे आणणार असल्याचेही महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले.

महाविकास आघाडी ‘सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल‘ या नावाने निवडणूक लढविणार आहे. सिनेटच्या 12 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. 10 जागांवर महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहेत. उर्वरित संस्था गटांतून दोन उमेदवार देणार आहेत. कॉंग्रेसचा उमेदवार नाही; परंतु ते आमच्याबरोबर आहेत, असा दावा शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत केला. युवासेना विस्तारक राजेश पळसकर, शर्मिला येवले, युवासेना अधिकारी सनी गवते, राम धरकुडे, समन्वयक युवराज पारिख, राष्ट्रवादीचे प्रवत्ते प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, रविकांत वरपे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Google Ad

याआधीच भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच पॅनेलकडून दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता विद्यापीठाच्या आवारात मुख्य धारेतील राजकीय पक्षांचा प्रवेश झाला आहे. विद्यापीठात आता भाजप आणि महाविकास आघाडी थेट लढत पाहायला मिळणार आहे.

वविद्यापीठ च्या आवारात आता थेट राजकाऱण होणार असल्याने, उघडपणे राजकीय पक्षांचा प्रवेश विद्यापीठात होत असल्याने याचा थेट परिणाम विद्यापीठीय व्यवस्थेवर होणार का? अशी भावना अनेकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

महाविकास आघाडी उमेदवारांची यादी:-

(खुला प्रवर्ग)

1) बस्ते बाकेराव विठोबा (शिवसेना सदस्य) 2) चापके नारायण देवराव (युवासेना सदस्य) 3) लोहार सोमनाथ (राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सदस्य) 4) यादव संजय शंकर (राष्ट्रवादी) 5) झांबरे आकाश भरत (राष्ट्रवादी).

ओबीसी प्रवर्ग

पठारे महेंद्र पंढरीनाथ (राष्ट्रवादी) महिला प्रवर्ग, इनामदार तबस्सुम शौकत (राष्ट्रवादी) एनटी प्रवर्ग, पालकर अजिंक्य सोमनाथ (राष्ट्रवादी) एससी प्रवर्ग, संदीप राजाराम शिंदे (शिवसेना) एसटी प्रवर्ग, पाडवी विश्वनाथ नानू (शिवसेना)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!