महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० डिसेंबर) : पिंपळे गुरव येथील कोरोना काळात बालपणातच आईचं छत्र हरपलेल्या सविता मारुती हिराळे हिने अबॅकस परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून आई-वडिलांचे पहिले स्वप्न साकार केले. भोसरी येथील मास्टर माईंड स्कूलमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. सदर परिक्षेत एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
पिंपळे गुरव येथील सविता हिराळे ही विद्यार्थ्यांनी द न्यू मिलेनियंम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकत आहे. मागील वर्षी तिने अबॅकस मध्ये प्रवेश घेऊन नुकतीच परीक्षा दिली होती. तिचा निकाल लागला. तिने या परीक्षेत १०० पैकी ८४ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला. सविताने बालपणीच आई, वडिलांचे पहिले स्वप्न पूर्ण केले. यावेळी अबॅकस क्लासच्या शिक्षिका जयश्री सोनवणे तसेच शाळेचे वर्ग शिक्षक आदिती सावंत, मुख्याध्यापक ईनयात मुजावर, प्राचार्य स्वाती पवार यांनी सविताचे कौतुक करीत अभिनंदन केले.
अत्यंत हलाकीची परिस्थिती असताना कोरोना काळात सविताच्या आईचे छत्र हरपल्यानंतर वडिल मारुती हिराळे आपल्या दोन्ही मुलींचा आईची माया देत सांभाळ करीत आहेत. बालपणापासूनच सविताला आणि धाकटी बहीण कार्तिकी हिराळे हिला मिळालेली आईची शिकवण, तिचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय उराशी बाळगत दोघी आत्तापासूनच शिक्षणात कोणतीही कसर न ठेवता अभ्यास करीत आहेत. सविता तशी पहिल्यापासूनच अभ्यासात खूप हुशार आहे. वडील देखील मुलींच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर कमी पडू देत नाहीत. मुलगी सविता अबॅकस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने वडील मारुती यांचे डोळे पानावले होते. ते म्हणाले मुलींनी आईचे स्वप्न पूर्ण केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…