Categories: Editor Choice

सांगवी मध्ये ‘डोनेट एड सोसायटी’च्या अध्यक्ष सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने मुली तसेच महिलांसाठी राखी मेकिंग वर्कशॉपला उस्फुर्त प्रतिसाद

महाराष्ट्र  14 न्यूज, (दि.०८ ऑगस्ट) : माननीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली  शंकर  जगताप( निवडणूक प्रमुख चिंचवड विधानसभा) तसेच आदरणीय माजी महापौर माई ढोरे यांच्या सहकार्याने आज रविवार दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी नऊ ते बारा यात यावेळी सांगवी मध्ये डोनेट एड सोसायटीच्या अध्यक्ष सारिका कृष्णा भंडलकर यांनी सांगवी परिसरातील पाच वर्षां वया पुढील मुली तसेच महिलांसाठी राखी मेकिंग वर्कशॉप चे आयोजन केले होते .

यावेळी सौ सारिका कृष्णा भंडलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना,नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन यांचे महत्त्व मुलांना सांगताना पारंपरिक संस्कृती परंपरा याचेही कसे जतन केले पाहिजे हेही त्यांनी नमूद केले. या शिबिराला आदरणीय महापौर माई ढोरे यांनी उपस्थित राहून सर्वांचे कौतुक केले.

या शिबिरामध्ये पाच वर्षे पुढील मुली मुलं तसेच महिला अशा 87 प्रशिक्षणार्थी यांनी लाभ घेतला .यावेळी त्यांना दोन प्रकारच्या राख्या कशा बनवायच्या तसेच इतरही राखी कशा बनवता येतील याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य आयोजकांतर्फे देण्यात आले तसेच या ज्या राख्या तयार झाल्या यातून स्वतःची कल्पकता वापरून मुलांनी घरी जाऊन तशाच पद्धतीने राखी बनवून त्याचा फोटो आयोजकांना पाठवायचा आहे.

या सर्व फोटो मधून उत्कृष्ट राखी बनवणाऱ्या मुलींना व महिलांना डोनेट एड सोसायटी अध्यक्ष सौ. सारिका कृष्णा भंडलकर यांच्या तर्फे आकर्षक बक्षीसही देण्यात येणार आहेत. यावेळेस डोनेटेड सोसायटीचे सांगवी परिसरातील सर्व सदस्य ही नियोजनासाठी उपस्थित होते. तसेच यावेळी आगामी होणारे शाडू माती पासून गणपती बनवणे तसेच हर घर तिरंगा अभियान याचेही माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. कृष्णा रघुनाथ भंडलकर यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

21 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago