महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ ऑगस्ट) : २५ लाख रुपये जगद्गुरूंच्या मंदिराला उद्योजक मा. राजेंद्र बांदल बावधन, पुणे यांच्याकडून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ प्राप्त झाले. स्वर्गिय वडिल भगवान गणपत बांदल यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने त्याच्या स्मरणार्थ लोकेनेते राजेंद्र बांदल यांनी देहूजवळील भंडारा देवस्थानला संत तुकाराम मंदिराकरीता 25 लाख तर भुकूममधील रामेश्वर मंदिरासाठी 5 लाखांची देणगी देत आपल्या दातृत्वाचे आज दर्शन घडवले.
आज पर्यंत ह भ प पंकज महाराज गावडे यांच्या प्रवचन सेवेत १ लाख, २ ते ३ लाख, ५ लाख, १० लाख, ११ लाख, १३ लाख, १७ लाख रुपयांचे देणगी मिळालेली होती परंतु आज मात्र इतिहास झाला ५० मिनिटांच्या प्रवचनात २५ लाख रुपयांची देणगी मिळाली त्यामुळे पंकज महाराज खूपच भावूक झाले.
पंकज महाराज गावडे म्हणाले, की राजेंद्र बांदल यांचा सायंकाळी फोन आला आणि म्हणाले महाराज तुम्ही आपल्या घरातील आहात त्यात प्रवचन ही तुमचे आहे, आणि जे कार्य भंडारा डोंगरासाठी तुमचे सुरू आहे त्याला मी आता कमी पडता कामा नये म्हणून मी वडिलांच्या दशक्रिये च्या प्रवचना वेळी तुमच्याकडे रुपये २५ लाखांचे देणगी रुपाने योगदान देतो. हे शब्द ऐकताच मन भरून आले. आपला मित्र, सखा, परिवारातील एक स्नेही भंडारा डोंगर येथील मंदिर कार्यासाठी सर्व प्रकारे मेहनत घेत आहे मग त्याला आपण बळ द्यायला हवे ही बांदल साहेबांची भावनाच मला खूप प्रेरित करून गेली खरे तर बांदल साहेब माझ्या आग्रहामुळे परिवरासहित माझे कीर्तन प्रसंगी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे आले होते आणि मी केलेला संकल्प पाहून प्रेरित झाले होते आज त्यांनी एक प्रकारे मी स्वीकारलेल्या व्रताला न्याय दिला असे मला वाटते.
वै.भगवान गणपत बांदल ज्यांना १०५ वर्षांचे आयुष्य मिळाले त्यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने त्याच्या स्मरणार्थ लोकेनेते राजेंद्र बांदल यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर साठी २५ लाख तर भुकूममधील रामेश्वर मंदिरासाठी 5 लाखांची देणगी चे चेक देत आपल्या दातृत्वाचे आज दर्शन घडवले.
या वेळी मा. आमदार चंद्रकांत दादा मोकाटे, आमदार शरद जी ढमाले, जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम समिती सभापती मंगलदास जी बांदल यांच्या हस्ते श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील जगद्गुरूंच्या मंदिर कार्याला पहिला ५ लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला व पुढील ५ लक्ष रुपयांचे ४ धनादेश तारखा टाकून देण्यात आले असे एकूण २५ लक्ष रुपयांचे योगदान दिले.
या प्रसंगी पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब जी चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवावादीचे अध्यक्ष दिपक भाऊ मानकर, भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव जी काळे, जिल्हा परिषद सदस्य शंकर भाऊ मांडेकर, माजी गटनेते शांताराम जी इंगवले, पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील जी चांदेरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता ताई दगडे, राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ हगवणे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दिलीप आण्णा दगडे पा., मा. नगरसेवक प्रमोद जी निम्हण, मा. नगरसेवक मनोहर जी पवार, हभप वसंत दादा कलाटे, मा. सभापती कोमल जी वाशिवले, मा.नगरसेवक किरण भाऊ दगडे, मा. नगरसेविका अल्पना ताई वर्पे, मित्र सुनिल जी खांदवे, मित्र जिल्हा नियोजन समिती सदस्य काळुराम जी नढे यांच्यासह मोठया संख्येने सरपंच, उपसरपंच, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, शासकीय पदाधिकारी, मित्र मंडळी व नातेवाईक असा उच्च शिक्षित आणि बुद्धिमान जनसमूदाय उपस्थित होता.
राजेंद्र बांदल यांनी आपल्या वडिलांच्या दशक्रियानिमित्त लाखो रुपयांची देणगी विविध धार्मिक संस्था, देवस्थानला दिल्या. पंढरपूर येथील मुळशी तालुक्यासाठी असणारी धर्मशाळा व जन्मभूमी बावधनमधील गणेश मंदिरालाही बांदल परिवाराकडून देणगी देण्यात आली. आजच्या कार्यक्रामचे सूत्रासंचालन टिव्ही 9 चे पत्रकार ऑलिंपिक सारख्या स्पर्धांचे बाहेरच्या देशातून आपल्यासाठी उत्तम वृत्तांकन करणारे मित्र संजय जी दुधाणे यांनी केले.
राजेंद्र बांदल हे पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक – चेअरमन तसेच हिमालय नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आहेत. वडील बावधनचे सर्वात जेष्ठ वयोवृद्ध होते ज्यांना सर्व जण अप्पा नावाने आवाज देत. र्तिर्थरुप अप्पा म्हणजे वै. भगवान गणपत बांदल हे बावधन येथील सर्वात वयोवृद्ध ज्येष्ठ होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेले अप्पा हे प्रगतशील शेतकरी होते. त्यांनी पारंपारिक शेती करत आज मुळशी तालुक्यात सर्वाधिक शेत जमीन असलेले ते शेतकरी म्हणून गणले गेले आहेत. त्यांनी मुलांना उच्चशिक्षित केले आणि त्यांच्या ह्या प्रेरणेने राजेंद्र बांदल यांनी पेरिविंकल स्कूल आणि हिमालय सहकारी संस्थेची स्थापना केली ज्या संस्था आज खूप नावारूपाला आल्या आहेत आणि आज तिर्थरुप वै.अप्पांच्या प्रेरणेने पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून पुण्यात आज ६ शाळा व ४ कॉलेजेस आहेत ज्यात ७०० शिक्षक असून साडेसात हजार विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. याशिवाय बांदल डेव्हलपर् प्रायव्हेट लिमिटेड, पन्हाळा लेक व्हिव कॉर्पोरेशन, वार. आर. बी. कन्स्ट्रक्शन कंपनी अशा तीन मोठ्या उद्योजक कंपन्या तिर्थरुप कै. अप्पांच्या प्रेरणेने राजेंद्र जी बांदल साहेब यांनी उभ्या केल्या आहेत ज्या आज मोठ्या प्रमाणात नावारूपाला आल्या आहेत.राजेंद्र बांदल यांचे आज कोल्हापूर, मुंबई, पुणे, कोकण येथे उद्योग क्षेत्र वाढवत असताना सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, आध्यात्म, सांस्कृतिक, चित्रपट निर्मिती, स्वतःचे वृत्तपत्र अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. ते प्रचंड शिस्तबध्द आहेत तर पूर्ण कुटुंब शाकाहारी असून रोज पहाटे ४ वाजता त्यांचा दिवस व्यायामाने, पूजेने सुरू होतो. अलीकडे वडील जागेवर असताना ते वडिलांना रोज आपल्या हाताने आंघोळ घालत होते. त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या रेखाताई या देखील आपल्या सासू सासर्यांची मनोभावे सेवा करत असतानाच सर्व शैक्षणिक संस्थांचे देखील व्यवस्थापन बांदल यांच्या सोबत पाहतात.
आज वडिलांच्या पिंडदान विधी निमित्ताने बांदल यांनी जी मदत जगद्गुरूंच्या मंदिर कार्याला केली त्या साठी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील आणि त्यांचे सर्व विश्वस्त यांचे वतीने त्यांचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले.