Categories: Uncategorized

संजय गांधी योजनेचे ऑफिस शहरात पूर्ण वेळ लवकरच सुरू करणार आमदार अश्विनी जगताप शासन आपल्या दारी योजनेचा 3060 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ डिसेंबर) : शासन आपल्या दारी या शिबिराचे उद्घाटन चिंचवड मतदार संघाच्या कार्यसम्राट आमदार अश्विनीताई जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड शहराच्या अप्पर तहसीलदार अर्चना निकम उपस्थित होत्या.

कार्यक्रमास संजय गांधी योजना तहसीलदार अमोल कदम परिमंडल अधिकारी सचिन काळे पिंपरी चिंचवड वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे मा महापौर माई ढोरे मा सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके भाजपा शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे मा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन सुरेश भोईर संतोष कांबळे विनायक गायकवाड प्रमोद ताम्हणकर कैलास थोपटे नगरसेविका सविता खुळे निर्मला कुटे शारदा सोनवणे भाजपा चिंचवड प्रचार प्रमुख काळुराम बारणे स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे विनोद तापकीर विठ्ठल भोईर सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते श्रीमंत शितोळे गणेश कस्पटे नामदेव शिंत्रे तानाजी बारणे गोरख कोकणे माधव मनोरे दीपक जाधव संतोष जगताप नेताजी नखाते माऊली जगताप प्रसाद कस्पटे रणजीत घुमरे बाळासाहेब साळुंके राजाराम कोकणे नागनाथ लोंढे दिनेश पवार महेंद्र गायकवाड उपस्थित होते.

सदर कार्यक्रमांमध्ये संजय गांधी योजना 592 श्रावण बाळ योजनेचे 159 रेशन कार्ड दुरुस्ती 245 आयुष्यमान भारत कार्ड 1389 आभा हेल्थ कार्ड 675 लाभार्थी सहभागी झाले होते संजय गांधी योजनेच्या 50 लाभार्थ्यांना तात्काळ मंजुरी पत्र आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते व पाहुण्यांचे हस्ते वाटप करण्यात आले राहिलेल्या लाभार्थ्यांचे पेन्शन पत्र एक महिन्यामध्ये वाटप होणार आहे असे तहसीलदार साहेबांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे आयुष्यमान भारत योजनेचे शहराध्यक्ष गोपाळ माळेकर यांनी सांगितले की संजय गांधी योजनेचे अर्ज निगडी येथे घेतले जातात परंतु मंजुरीसाठी खडकमाळ पुणे तहसील कार्यालय मध्ये जात आहेत तरी लाभार्थ्यांना होणारा त्रास हा कमी करावा व अपर तहसील कार्यालय निगडी येथे प्रकरणे मंजुरीचे कामकाज चालण्यासाठी ऑफिस सुरू करावे अशी मागणी केली.

याप्रसंगी आमदार अश्विनीताई जगताप यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चार वर्षांपूर्वी निगडी येथे कार्यालय चालू केलेले आहे ते 50 टक्के राहिलेले काम मी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात प्रश्न मांडून व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून निगडी तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी योजनेचे पूर्ण कामकाज सुरू करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे व नागरिकांचे अडचण दूर करून न्याय मिळवून देईन असे आश्वासन दिले आलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गांधी योजनेचे अध्यक्ष नरेंद्र माने समितीचे सदस्य संजय मराठे दिलीप गडदे राजेंद्र पाटील आदिती निकम रेखा माने कुंदा गडदे यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गांधी योजना समितीचे मा अध्यक्ष गोपाळ माळेकर यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन …. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन  - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…

2 days ago

एकाच तिकीटावर मुंबईकरांना सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरता येणार’

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…

4 days ago

महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट…* *आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज मोरे यांचा सन्मान..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…

2 weeks ago

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने … पिंपळे गुरव परिसरात २० हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…

3 weeks ago

स्वच्छतेमुळेच पेशंट बरे होण्यास मदत होते – नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…

3 weeks ago