Google Ad
Editor Choice Education

सांगवीतील मृत्युंजय शाळेच्या विद्यार्थ्यांचा … पावसाच्या वर्षावात हरिनामातून पर्यावरण जल्लोष

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जुलै) : सांगवीतील मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभाग सांगवी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई आणि वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशात भक्तिमय पर्यावरण दिंडीत सहभाग घेतला.प्राणी पक्षी व विविध वृक्ष यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दिंडी ची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी ढोल लेझीम चे विविध प्रात्यक्षिक दिंडीच्या माध्यमातून सादर केले. तर काही विद्यार्थी ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करत हातात टाळ ध्वज पताका घेऊन दिंडीत सहभागी झाले.

कोरोनामुळे दोन वर्षानंतर प्रथमच विद्यार्थ्यांना दिंडीतून सहभागी होताना अतिशय आनंद वाटला. पावसाच्या धारा सुद्धा मुलांच्या उत्साहाला अडवू शकल्या नाही.संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक घोषणा देत नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली. औषधी वनस्पतींचे जतन करण्यासाठी हस्तलिखित प्रती वाटून त्यांचे महत्त्व सांगवी परिसरातील नागरिकांना सांगण्यात आले. विविध फलकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षसंवर्धनाच्या घोषणा दिल्या दिंडी मार्गातील विविध मान्यवरांना विद्यार्थ्यांच्या हस्ते छोटे रोप भेट स्वरूपात देण्यात आले.

Google Ad

पिं. चिं. म.न.पा.च्या माजी महापौर सौ. माई ढोरे तसेच मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक विश्वस्त मा.शामरावजी कदम यांनी दिंडीतील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मृत्युंजय शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. प्रमिला जाधव यांनी सर्व दिंडीचे संयोजन केले.

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!