Google Ad
Editor Choice

सांगवीचा ‘ओंकार भागवत’ देतोय … कोरोनाच्या काळात गरजू रुग्णांना मदतीचा हात … दररोज अनेक रुग्णांना मोफत घरपोच जेवण!

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. ०३मे) : सध्या कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विचार करता पिंपरी चिंचवड यामध्ये हॉटस्पॉट बनत चालला आहे. लॉकडाऊन मुळे सगळी दुकाने, हॉटेल्स बंद आहेत. अशा वेळेस होम आयसोलेट असणाऱ्या रुग्णांसाठी किंवा संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित असणाऱ्या व्यक्तींकडे पैसे असून सुद्धा भोजनाची सेवा देताना अडचणी निर्माण होतात.

अशा सर्वसामान्य कुटुंबातील मोफत जेवणाची सुविधा देता येईल का अशी संकल्पना ओंकार महेश भागवत या युवकास सुचली त्यांनी ती आपल्या ‘सांगवी विकास मंच’ च्या माध्यमातून सांगवी परिसरात प्रत्यक्षात साकारून ही मोफत सेवा १५ दिवसांपासून उपलब्ध करून दिली आहे. आज दिवसाला २४० नागरिक याचा लाभ घेत आहेत. यात चपाती-भाजी, वरण-भात किंवा पुलाव, स्वीट यांचा समावेश आहे.

Google Ad

सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव मधील कोरोनाग्रस्त रुग्ण जे Home isolation म्हणजेच घरी होमवारंटाईन असतील , व ज्यांना जेवण बनवण्यास अडचण होत असेल , अशा रुग्णांना घरपोच मोफत जेवण आणून देण्यात येईल व जेवण मागवायचे असल्यास आमच्याशी सकाळी ९ च्या आधी संपर्क साधावा, ( संपर्क 9604141516 ) असे आवाहन, सांगवी विकास मंचचे कार्याध्यक्ष ओंकार महेश भागवत यांनी केले आहे.

यावेळी बोलताना ओंकार म्हणाला, “मागील महिन्यात आम्ही मित्र दररोज अभ्यास करण्यासाठी एकत्र जमत होतो . त्यातील काही मित्र खोली भाड्याने घेऊन राहतात. त्यातील काहीना कोरोना संसर्गाने पॉझिटिव्ह आल्याने त्यांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले, त्यावेळी त्यांचे जेवणाचे जे हाल झाले , ते पहावले नाहीत. त्यामुळे मला आपण या गरजवंताकरीता काहीतरी केले पाहजे, त्यामुळे ही सेवा करण्याचा निर्णय मी घेतला यात मला माझे मित्र आणि कुटुंबातील सर्वाचे सहकार्य लाभते आहे. अनेक लोक मदतीला हातभार लावण्यासाठीही तयार झाल्याचे यावेळी ओंकार सांगत होता. त्याच्या या संकट काळातील मदतरुपी समाज कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

240 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!