Categories: Uncategorized

सांगवी पोलीसांनी पाठलाग करून आरोपीला केले जेरबंद …२ देशी बनावटीचे पिस्टल व ४ जिवंत राऊंड केले जप्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवध्यरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या व गोहत्या करणारे गुन्हेगाराचा शोध घेवून त्याचेविरुध्द कडक कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते. त्या अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक एम.डी. वरुडे व पोलीस अमलदार तसेच गोहत्या प्रतिबंधक पथकातील सहा पोलीस निरीक्षक गणेश खारगे असे अवैध शस्त्र बाळगणारे व गोहत्या करणारे गुन्हेगारांची माहिती घेत होते.

दि.०२/०५/२०२३ रोजी गोहत्या प्रतिबंधक पथकातील सहा पोलीस निरीक्षक गणेश खारगे, पो.ना. ११९४ विवेक गायकवाड, पो. कॉ.३२०८ विशाल गायकवाड, पो.शि. २३६५ आकाश पांढरे व सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील प्रमुख पोलीस उप निरीक्षक एम. डी. वरुडे, व तपास पथकातील पोलीस अंमलदार पोना / १५३४ प्रविण पाटील पोगा / १५३५ विजय मोरे, पो. कॉ/२२०९ सुहास डंगारे, पो. हवा. ८५९ संजय डामसे असे संयुक्तीक रित्या सदर भागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना दि.०२/०५/२०२३ रोजी ०२.०० वा एक इसम रक्षक चौक ते पिंपळे निलख जाणारे रोडवर पायी चालत जाताना दिसला सदर इसमाचे पाठीवर एक काळे रंगाची रॉक होती सदर रॉक मध्ये काय आहे. असे विचारता तो रस्त्याचे डावे बाजुला असले झाडी झुडपात पळुन जात असताना वरील पोलीस स्टाफचे मदतीने त्याचा पाठलाग करून सदर आरोपीस पकडण्यात आले.

 

राम परशुराम पाटील वय २९ वर्षे रा. शिवशोभा बिल्डींग जयमल्हार कॉलनी नं ६, थेरगाव पुणे मुळ गाव टाकळी, ता. उदगीर जिल्हा लातूर असे आरोपीचे नाव असून त्याचे खांदयावर असले काळे रंगाचे सॅक मध्ये काय आहे असे विचारता तो उडवाउडविची उत्तरे देवु लागला दोन पंचाना बोलावुन त्यांचे समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात ०२ स्टेनलेस स्टिलचे देशी बनावटीचे पिस्टल त्यास स्ट्रिंगर गाड, मॅगजिन असलेले व ०४ जिवंत पितळी (राऊंड) असा मुद्देमाल मिळुन आला.

सदर बाबत सविस्तर पंचनामा करून मुद्देमाल जप्त करुन लेबल लावुन सिल करुन त्यास सांगवी पोलीस स्टेशन येथे आणुन सखोल तपास केला असता त्याने मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांचे कार्यालय दिनांक ०२/०५/२०२३ रोजीचे आदेशान्वये पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तलय कार्यक्षेत्रात दिनांक ०२/०५/२०२३ रोजी ००:०१ ते दिनांक १५/०५/२०२३ रोजी २४:०० वा. पर्यंत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ ज्वलनशील दगड अथवा शस्त्रे अस्त्रे सोटे, तलवारी, भाले लाठी, बदुका किंवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे अथवा बाळगणे बाबत मनाई आदेश असताना, सदर आदेशाचा भंग करुन, त्यांचे कब्ज्यात ०२ स्टेनलेस સ્ટિનન્દે વેશી વનાવટીને પિસ્ટત, ૧૦૪ બિવંત પિત∞ી (રાડ), ખવ∞ વાગ્યાના ભાળતાદી ાયકેશીર परवाना नसताना अवैधरित्या बाळगले असताना मिळुन म्हणुन त्याचे विरुद्ध सांगवी पोलीस स्टेशन गु.र.नं २०४ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) (२७) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीस अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमाड घेवुन अधिक कसून चौकशी केली असता सदर आरोपीने दि. २२/०४/२०२३ रोजी रावेत येथे चैन स्नॅचिंग केली असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगारअसुन त्याचे विरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतच्या भव्य-दिव्य वास्तूची प्रत्यक्ष भाजप पदाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 एप्रिल :पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगत आणि आधुनिक प्रतिमेला साजेसी अशी महानगरपालिकेची नवीन…

16 hours ago

शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम .. काव्यशायराना’तून समतेचा संदेश; वसीम बरेलवी यांच्या शायरीने रंगली मैफल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ एप्रिल २०२६ – शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम…

4 days ago

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर – सभापती रविना आंगोळकर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ एप्रिल २०२६ :* बालवाडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा…

5 days ago

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

1 week ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

1 week ago