Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनाच्या मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता सांगवी गॅस शवदाहिनी आता पूर्णपणे सज्ज … मनसेचे ‘राजू सावळे’ यांच्या पाठपुराव्याला यश!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २३मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी गॅस शवदाहिनीची खुपच दैनीय अवस्था झाली होती वारंवार बंद पडणे. यावेळी कोरोना काळात अंत्यविधीसाठी पिं.चिं.शहरातून हजारांच्या संख्येने शव येत असतात.

नागरिकांच्या अंतविधीसाठी नेहमीच परिसरातील नागरिकांना याठिकाणी जावे लागते, त्यावेळेस सर्वांच्या निदर्शनास या गोष्टी येत होत्या, पण या ठिकाणी जाणार कोण दखल घेणार कोण? पण पिंपरी चिंचवड मनसेचे उपाध्यक्ष राजू सावळे याला अपवाद आहेत. ते नेहमीच अशा समाजोपयोगी कार्यात भाग घेताना दिसतात. मागील वर्षापासून तर आजपर्यत अंतविधी करीता अडचणीना सारखेच सामोरे जावे लागत होते. पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने कोरोना रुग्णांचे शव अंतविधी लाकडावरती करण्यासाठी परवानगी दिली त्यामुळे प्रश्न मार्गी लागला काही वेळस तर नाइलाजास्तव शव पुणे व पिं.चि.इतर ठिकाणी पाठवण्याची वेळ येत होती.

Google Ad

अशा अनेक अडचणी येत होत्या या करीता मनसेचे राजू सावळे हे नेहमीच पत्र व्यवहार करत असत. विद्युत विभागाची काही दुरूस्तीची कामे शवदाहिनीचा मुख्य दरवाजा दुरूस्त,आऊटलेटचा फुटलेला नविन पाईप टाकला ,शव स्टॅड कनव्येर चैन दुरूस्त,गॅस बरनलच्या ब्लोरची मोटार बदलने इत्यादी करिता नेहमीच पाठपुरावा करताना दिसत असतात आणि त्यांच्या या पाठपुराव्याला यशही मिळाल्याचे दिसून आले.

या व्यतरीक्त राजू सावळे यांनी प्रशासनच्या मागे लागून काही म्हत्वाची कामे करून घेतली यात दोन मोठे स्टॅड पंखे,दोन ॲग्जोस पंखे बसवले ,आग विझविण्यासाठी दोन फायर बॅाटल,बोरवेल बंद पडले होते समसेबल नविन मोटर बसविली,लाईट गेली तर सर्व अंधार होत असे जनरेटरवर एक हॅलोजन बसविण्यात आला,बंद पडलेले दिवे दुरूस्त करून घेतले, अनेक दिवसापासून एक म्हत्वाची मागणी होती ती म्हणजे येथे टॅायलेटची व्यवस्था नव्हती काही दिवसांपूर्वीच स्थापत्य विभागाकडून दोन फायबरचे टॅायलेटही बसवले आहे.

त्यामुळे आत्तातरी सर्वच अडचणी दुर झालेल्या आहेत, काम केल्याबद्दल विद्युत विभागाचे तसेच स्थापत्य विभागाचे राजू सावळे यांनी आभार मानले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!