Sangola : महाराष्ट्राचे माजी मंत्री, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०जुलै) : महाराष्ट्राचे माजी मंत्री, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (वय 96) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. सोलापूरमध्ये एका खासगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पित्ताशयाची शस्त्रक्रिया ही पडली पार पडली. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.

शेतकरी कामगार पक्षाकडून (PWP) सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तब्बल 11 वेळा प्रतिनिधित्व केले होते. आबासाहेब या नावाने ते परिचित होते. त्यांचा जन्म 10 आॅगस्ट 1926 रोजी झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेतील बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्रात विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केलेले नेते म्हणून त्यांचा लौकीक होता. गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. त्यांनी पहिल्यांदा 1962 मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांचा केवळ दोनदाच पराभव झाला. 1972 आणि 1995 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ते सलग आमदार राहिले. 1972 च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी ते त्यानंतर झालेल्या 1974 च्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते.

आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना लागला तुरुंगवासही भोगावा लागला होता. 1977 साली गणपत आबांनी महाराष्ट्र विधानसभेच ‘विरोधीपक्ष नेते’ पद सांभाळले होते. त्यानंतर 1978 मध्ये शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले. त्यानंतर1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री झाले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. एसटी बसने प्रवास आणि साधी राहणी यामुळे ते लोकप्रिय होते.

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

6 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago