Google Ad
Uncategorized

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करत पत्नी अश्विनी जगताप यांनी केली अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मार्च) : चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी सन २०२३ -२४ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेत भाग घेताला. यावेळी सुरुवात करताना त्यांनी आपले पती दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना अभिवादन केले.

यावेळी बोलताना अश्विनी जगताप म्हणाल्या, “माझ्या चिंचवड मतदारसंघातील पवना नदीच्या तीरावरील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर हे पुरातन जागरूक देवस्थान असून चिंचवड या ठिकाणी सदगुरू महासाधु श्री मोरया गोसावी यांनी योगमार्गाने संजीवन समाधी घेतली असून याला ४६० वर्षे पूर्ण झाले आहेत. राज्यभरातून व शहरातील लाखो भाविक श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी पुण्यतिथी उत्सवाला व दरमहा चतुर्थीला मोठ्या प्रमाणावर देवदर्शनासाठी येतात. श्री मोरया गोसावी मंदिर देवस्थान व मंगलमुर्ती वाडा परिसर सुशोभीकरण करणे, पादुकामंदिर,सभा मंडप, संरक्षण भिंत उभारणे, मुख्य प्रवेशद्वार जतन संवर्धन व दर्जा वाढ करणे इत्यादी कामांकरिता शासनाच्या पर्यटन स्थळ विकास कार्यक्रम अंतर्गत श्री मोरया गोसावी मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्टला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करून निधीची पूर्तता करणे.

Google Ad

तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एकाच कुटुंबातील तीन भावंडानी दिलेले बलिदान संपूर्ण देशामध्ये एकमेव स्फूर्तीदायक उदाहरण असलेले क्रांतिवीर चापेकर बंधूचा जन्म, बालपण, व शिक्षण हे चिंचवडच्या ऐतिहासिक भूमीत झालेले आहे. चाफेकर वाड्याला हजारो देशभक्त व पर्यटक भेट देतात. श्री क्षेत्र चिंचवड क्षेत्राचा विकास व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पर्यटकांना सोई सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या सहकार्याची व निधीची नित्यंत आवश्यकता आहे. चिंचवड या धार्मिक व ऐतिहासिक स्थळाचा शासनाच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करून विकास करणे आवश्यक आहे.

याही मागणीचा केला पाठपुरावा :-

पुणे जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मावळ तालुक्यात लोणावळा खंडाळा राजमाची कार्ला येथे थंड हवेच्या ठिकाणी देशभरातून पर्यटक येणे. लोणावळा-खंडाळा परिसराचा राष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणे आवश्यक असणे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगड विसापूर किल्ल्यांचे संवर्धनाची दुरुस्ती पर्यटकांना सोयी-सुविधा पुरवणे त्याच बरोबर श्री एकविरा माता कार्ला लेणी व शिरगाव साई मंदिर येथे हे पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार पर्यटकांसाठी व भाविकांसाठी पायाभूत सोयी सुविधा उभारण्याकरिता निधीची आवश्यकता असणे. मावळ तालुक्यातील पर्यटन करिता विशेष लोणावळा-खंडाळा कार्ला याचा सर्वांगीण पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता व देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबत शासनाने नियोजनबद्ध सदर परिसराचा विकास करण्याकरिता निधी उपलब्ध करून करण्याची आवश्यकता असणे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!