महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ फेब्रुवारी) : स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त (दि.१५ फेब्रुवारी) पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांकडून स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यात येणार आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांची ही पहिलीच जयंती आहे. या निमित्ताने शहरातून लक्ष्मण जगताप यांना मानणारे कार्यकर्ते पिंपळे गुरव येथील स्मृतीस्थळावर दाखल होणार आहेत. लक्ष्मणभाऊंचे यांचे स्मृतिस्थळ हे कार्यकर्त्यांकरीता ऊर्जास्रोत आहे. त्यांच्या स्मृतिना अभिवादन करून उजाळा देण्यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत.
दि.०३ जानेवारी २०२३ रोजीआमदार लक्ष्मण जगताप यांचे दुःखद निधन झाले, लक्ष्मण जगताप यांचे कार्य पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य माणसाला माहीत आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांची नाळ ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत जोडली गेली होती, आणि त्याचमुळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अवघा जनसागर लोटला होता. त्यांच्या दशक्रिया विधीलाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन राजकारणातील दिग्गज आणि नागरिक सहभागी झाले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांचा १५ फेब्रुवारी हा जन्म दिवस असून ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, या ठिकाणी पिंपळे गुरव येथे त्यांच्या स्मृतिना अभिवादन करून उजाळा देण्यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…