Google Ad
Editor Choice

नवी सांगवीतील फेमस चौकात साकारला, रस्त्याच्या मध्यभागी आगळावेगळा दिशादर्शक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मार्च) : नवी सांगवी तील फेमस चौकात रस्त्याच्या मध्यभागी पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने दिशादर्शनासाठी शोभणीय असे रंगीत चित्र साकारण्यात आले आहे. इंग्रजी (E-W-N-S) अक्षरांनी साकारलेल्या या दिशादर्शक चित्राने जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांचे आणि पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नवी सांगवीतील फेमस चौकात चारही दिशांनी येणाऱ्या वाहनांच्यामुळे हा चौक वर्दळीचा झाला आहे. महानगरपालिकेच्या वतीने या चौकात येणारे चारही रस्ते सिमेंट काँक्रीटचे करून अतिक्रमण मुक्त केल्याने हा चौक मोठा वाटू लागला आहे. त्यामुळेच मध्यभागी बनविण्यात आलेल्या दिशादर्शकास चांगली शोभा आली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आठही दिशा दाखवण्यात आल्या आहेत, आता नागरीकांनी सहकार्य करून परिसराच्या सौंदर्यास हातभार  लावावा हीच अपेक्षा …

Google Ad

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!