Google Ad
Editor Choice

कासारवाडी दत्त मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात रंगला हरिनामाचा गजर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथे श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रम मंदिरात, दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. पहाटे काकडारतीपासून सुरुवात होत गुरू चरित्र ग्रंथांचे पारायण, महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, दररोज कीर्तन सेवा अशा धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने पिंपळे गुरव-कासारवाडी परिसरातील वातावरण धार्मिक आणि प्रसन्नतेने भारावले आहे.

श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम कासारवाडी येथे दत्तजयंती निमित्त माननीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि मित्रपरिवार यांच्या वतीने सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज चौथ्या दिवसाची किर्तनसेवा रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी केली.

Google Ad

संत हे समाजाची सेवा करत असतात. समाज उद्धाराचे कार्य संतांच्या हातूनच घडत असते. त्यामुळे संतांचा महिमा फार मोठा आहे. असे मत त्यांनी आपल्या हरी कीर्तनातून मांडले. या किर्तन सप्ताहामध्ये संत तुकाराम महाराज मंदिर, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर, मावळ येथील मंदिरासाठी विविध भाविकांकडून देणगी देण्यात आली.

या कीर्तन सेवेनंतर कोरोना महामारीतच्या काळात उत्कृष्ट सेवा केलेल्या विविध डॉक्टरांचा, शिक्षक, समाजसेवक तसेच पंचक्रोशीतील मान्यवरांचा सन्मानचिन्ह, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मा. शामराव वाल्हेकर, संतोष पिंपळे, चिंतामण भाऊ भालेकर, रेवननाथ चव्हाण, दत्तोबा भोंडवे, बापूसाहेब ढमाले, तुषार तरस, विजयभाऊ भोंडवे, माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेवक सागर अंगोळकर, विजूशेठ जगताप, सुभाष दादा काटे, नाना करंजुले, सौ.जयश्रीताई जगताप, भाऊसाहेब जाधव, उद्धव कवडे, बाळासाहेब पाटील, जोपाशेठ पवार, विष्णू खांदवे, सतिश काशिद, गणेश सोनवणे, जगन्नाथ नाटक, सुनील येडे, मनोहर ढमाले, हभप आप्पा बागल, शंकरराव शेलार, ज्ञानेश्वर खेरे, रमेश काशिद, विजयराव काटे, सत्यनारायण राठी, श्री डुंबरे, संजय मराठे, सुरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच कासारवाडी व पिंपळे व परिसरातील असंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते. या सप्ताह निमित्त आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व मित्र परिवाराच्या वतीने सर्व भाविकांना रोज महाप्रसादाचे वाटप केले जाते. गुरुवार दि.१६ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७.०० वा. ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!