महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांचे आज दि.१४ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंपळे गुरव, नवी सांगवी- सांगवी गाव तसेच त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शोभा आदियाल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका होत्या, त्यांनी २००७ ते १२ या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांनी आपला मुलगा अमर आदियाल यांच्यासह ०६ मार्च २०२२ रोजी लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचेही पक्षात स्वागत केले.
शोभा आदियाल यांना त्यांच्या सामाजिक कार्यामुळे पिंपळेगुरव व सुदर्शननगरमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या या निधनाने पिंपळे गुरव परिसरावर शोककळा पसरली आहे, त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी याकरिता पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांच्या व लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!!
माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांचे आज दुःखद निधन झालं आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो व आदियाल कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
शोकाकुल
शंकर पांडुरंग जगताप
शहराध्यक्ष भाजप पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)
टीप :- अंत्यविधी आज गुरुवारी सायंकाळी ०५ .०० वाजता च्या सुमारास पिंपळे गुरव स्मशानभूमी येथे होईल.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ ऑगस्ट २०२५ :* कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…
महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम…