Categories: Uncategorized

ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेला ‘पीएसआय’ परीक्षा उत्तीर्ण किरण मुंडेची मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स च्या “असिस्टंट रिसर्च ऑफिसर” पदी महाराष्ट्रात 28व्या क्रमांकांनी निवड

ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेला ‘पीएसआय’ परीक्षा उत्तीर्ण किरण मुंडेची मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स च्या “असिस्टंट रिसर्च ऑफिसर” पदी महाराष्ट्रात 28व्या क्रमांकांनी निवड

किरण मुंडे यांची मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स च्या “असिस्टंट रिसर्च ऑफिसर” पदी महाराष्ट्रात 28व्या क्रमांकांनी निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जानेवारी)  : ग्रामीण भागात बालपण व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या किरण मुंडे यांची मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स च्या “असिस्टंट रिसर्च ऑफिसर” पदी पाहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात 28व्या क्रमांकांनी निवड झाली आहे. किरण यागोदर 2018 साली ‘पीएसआय’ची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. परंतु प्रशासकीय विभागात मोठ्या पदावरती काम स्वप्न बाळगल्यामुळे किरणने ‘पीएसआय’ पदी रूजू न होता सतत अभ्यास चालू ठेवला. पिंपरी चिंचवड मधील यमुनानगर मध्ये राहत असलेल्या किरणला पिंपरी चिंचवड मधील ओझर्डे’ज रॅडिकल एज्युकेशन इंस्टीट्यूट’ चे डायरेक्टर प्रा.भूषण ओझर्डे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण करतात. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही, हे किरणने सिध्द करून दाखविले आहे. कधीही शॉर्टटर्म यशाकडे न वळता, येईल त्या परिस्थितीला सामोरे जात, ध्येयाकडे वाटचाल करत किरणने पाहिल्याच प्रयत्नात मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स च्या “असिस्टंट रिसर्च ऑफिसर पदाला गवसणी घातली आहे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही राज्य शासनाची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत असन संचालनालयास राज्यातील सांख्यिकीय बाबींसाठी “नोडल एजन्सी ” म्हणून घोषित करण्यात आले आहे. सांख्यिकीय बाबींसंबंधी राज्य आणि केंद्र सरकार मधील दुवा म्हणूनही हे संचालनालय काम पाहते.

किरण याची घरची परिस्थिती जेमेतेमच आहे. वडील नोकरी करतात तर आई घरकाम सांभाळते. किरण हा लहानपणापासूनच हुशार असल्याने आईवडिलांची त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. किरण याच्या शिक्षणासाठी त्याचे आई-वडिलांनी अपार कष्ट केले आहे.किरणने शालेय शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे. बीए व एमए इकॉनॉमिक्स नांदेड विद्यापीठातून झाले आहे. किरण मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर शिक्षण तर पूर्ण केलेच; मात्र अनेक छोटी-मोठी कामे करत अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळविले आहे.

शिक्षणाच्या निमित्ताने रस्त्यावरून जात असताना शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालये पाहून त्याला मनात कुठेतरी आपणही असेच उच्च अधिकारी व्हावे, असे वाटत होते. एकाग्र मन व ठाम निर्णय घेण्याची क्षमता, आत्मविश्वासाच्या बळावर, जिद्द व चिकाटीने त्याने आपले शिक्षण व्यवस्थित पार पाडले आहे. आईवडील कसे कबाडकष्ट करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत याची पूर्णपणे जाणीव किरणला होती.

“प्रामाणिकपणे कष्ट केल्यास या जगात अशक्य असे काहीच नाही’ हे किरणला चांगलेच समजले होते. त्यामुळे त्यांने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कारण की, मनात कुठेतरी त्याला शासकीय सेवेचे आकर्षण होते. अखेर त्याची आज मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स च्या “असिस्टंट रिसर्च ऑफिसर या पदी निवड झाली. शिक्षण घेत असताना पाहिलेले स्वप्न व आईवडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज आज अखेरीस पूर्ण झाले आहे. लहानपणापासून मोठे स्वप्न पाहत अभ्यास करणाऱ्या किरणने कष्टाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलाने मिळवलेले हे यश व संघर्षमय प्रवास असणाऱ्या किरण याचा आदर्श इतर युवकांनी घेतला पाहिजे, असे किरणचे मार्गदर्शक प्रा.भूषण ओझर्डे यांनी संगितले.

प्रचंड इच्छाशक्ती असेल तर तुमच्या ध्येयपूर्तीसाठी कोणतीच गोष्ट अडथळा ठरू शकत नाही; फक्त बुद्धिमत्तेस आत्मविश्वास आणि संघर्षाची जोड हवी. माझ्या आई वडिलांचं मी अधिकारी व्हावं असं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व मुलाखत साठी निगडी येथील ओझर्डे’ज रॅडिकल इंस्टीट्यूटचे प्रा.भूषण ओझर्डे यांचे एखाद्या मित्राप्रमाणे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचं किरण मुंडे याने सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी : जिममध्ये आला व्यायाम केला, पाणी पिताच …

महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम…

47 mins ago

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड मनपाच्या वायसीएम रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५ :* जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव…

2 hours ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये ‘स्पंदन’ उपक्रमाची सुरुवात! … ६० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य शिक्षणाचा लाभ मिळणार

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांचा…

9 hours ago

️ पिंपरी चिंचवडकरांनो, महाराष्ट्र14 न्यूज टॉपच्या घडामोडी नक्की वाचा!

  महाराष्ट्र 14 न्यूज :- 01 ऑगस्ट 2025 ️ पिंपरी चिंचवडकरांनो, 'महाराष्ट्र14 न्यूज' टॉपच्या घडामोडी…

13 hours ago

अवघ्या विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांचा १५ ऑगस्ट रोजी सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव राज्यभरात साजरा केला जाणार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि, 01 ऑगस्ट -- ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव १५…

20 hours ago