Delhi : स्वयंपाकाच्या गॅसवर सिलेंडरवर 800 रुपयांची सूट … ऑफर 31 मेपर्यंत !

महाराष्ट्र 14 न्यूज : या महिन्यात सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. एलपीजी देखील प्रति सिलेंडर 809 रुपये आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर तुम्हाला सूट मिळू शकत नाही कारण ते तेल कंपन्यांच्या हाती आहे. पण LPG म्हणजेच स्वयंपाकाच्या सिलेंडरवर 800 रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळू शकते. (LPG Booking Offer)कसे ते जाणून घेऊया.

▶️एलपीजी सिलेंडरवर 800 रुपये सवलत!

पेटीएमने या महिन्यात एलपीजीच्या बुकिंग आणि पेमेंटसाठी आपल्या ग्राहकांना बम्पर ऑफर दिली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना केवळ 9 रुपयांमध्ये 809 रुपयांचे गॅस सिलेंडर मिळू शकेल.

या कॅशबॅक ऑफरअंतर्गत पेटीएम एपमधून ग्राहक पहिल्यांदाच गॅस सिलेंडर बुक करत असल्यास त्याला 800 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते.

तुम्हालाही पेटीएमच्या या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर 31 मे 2021 पर्यंत संधी आहे. जे ग्राहक पहिल्यांदाच पेटीएमच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडर बुक करुन पेमेंट करतील अशा ग्राहकांसाठी ही ऑफर आहे. जेव्हा आपण एलपीजी सिलिंडर बुक कराल आणि पेमेंट कराल तेव्हा ऑफर अंतर्गत एक स्क्रॅच कार्ड मिळेल, ज्यात 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक असेल.

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

पहिल्या एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगवर ही ऑफर आपोआप लागू होईल. ही ऑफर फक्त 500 रुपयांच्या किमान पेमेंटवर लागू होईल. कॅशबॅकसाठी, आपल्याला स्क्रॅच कार्ड उघडावे लागेल. जे आपल्याला बिल पेमेंटनंतर मिळेल. कॅशबॅकची रक्कम 10 ते 800 रुपयांपर्यंत असू शकते. आपल्याला हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत उघडावे लागेल. त्यानंतर तुम्ही हे वापरु शकत नाही.

या ऑफरचा घेण्यासाठी आपल्या मोबाइल फोनमध्ये पेटीएम एप (Paytm App) डाउनलोड करावा लागेल. यानंतर आपल्या गॅस एजन्सीचे सिलेंडर बुकिंग करावे लागेल. त्यासाठी पेटीएम अ‍ॅपमध्ये Show more वर जा आणि Recharge and Pay Bills वर क्लिक करा.

यानंतर, आपल्याला सिलेंडर बुक करण्याचा पर्याय दिसेल. येथे, आपला गॅस प्रोवाईडर निवडा. बुकिंग करण्यापूर्वी, आपल्याला FIRSTLPG हा प्रोमो कोड टाकावा लागेल. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

17 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago