महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील नवीसांगवीतील साई चौकामध्ये भाजी मार्केट येथील रोहित्रला सर्व बाजूंनी जाहिरात फलकाने गिळंकृत केले आहे, यात चूक कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना २४ तास अत्यंत जबाबदारी चे काम असते, मग जाहिरात लावणाऱ्या नागरिकांना केव्हा समज येणार?… हा प्रश्न सुद्धा नागरिकच विचारत आहेत.
पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत असताना नागरिकांनी ही स्मार्ट बनायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. एखादी चुकीची गोष्ट झाली की प्रशासनाकडे बोट दाखवणे कुठेतरी थांबले पाहिजे, आणि नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे. अशा जाहिराती लावणाऱ्यावर त्यावर असणाऱ्या नाव आणि फोन नंबर घेऊन संबंधितावर महावितरण ने कारवाई केली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नवी सांगवी येथे साई चौकात असणाऱ्या या रोहित्रास आत मध्ये जर आग लागली तर रोहित्राचा स्फोट झाल्यावरच कळेल. अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी भाजी मंडई असल्याने येथे नागरिकांची सततची वर्दळ असते त्यामुळे दुर्दैवाने दुर्घटना घडली तर जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना या अगोदर ही घडल्या आहेत, त्यामुळे ज्यांनी हे फलक लावले ते तातडीने कापडी फलक काढून टाकण्यात यावेत नाहीतर त्यावर कारवाई करण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला आहे. महावितरण ने ही ‘येथे जाहिरात लावू नये’ असा फलक सर्व रोहित्रावर लावला पाहिजे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ ऑगस्ट २०२५ :* हातामध्ये तिरंगा घेऊन चालणारे विद्यार्थी, देशभक्तीच्या घोषणांनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…
यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…
आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…