महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ डिसेंबर) : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना चांगले रस्ते आणि पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोणातून कार्यवाही करावी. पिंपळे गुरव आणि परिसरातील गृहनिर्माण सोसायटी, कॉलनींमधील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम आगामी चार महिन्यात पूर्ण करावे, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली.
‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत पिंपळे गुरव येथील भीमाशंकर कॉलनी, गणेशनगर, विजयराज कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सागर आंगोळकर, शशिकांत कदम, माजी नगरसेविका उषा मुंडे, माजी स्वीकृत सदस्य महेश जगताप, अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष अजय दूधभाते, भाजपा शहर आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग कोरके, अनिता जाधव, रत्नमाला दूधभाते, महानगरपालिकेचे उपअभियंता सुनिलदत्त नरोटे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील शिर्के, रंजना सुपे, हीरा विरनक, कल्पना बनसोडे, शांता साळुंखे, लक्ष्मी गोंदे, गिरीजा भोजने, अनुसया धादवड, सीमा साबळे, संगीता भांगरे, सीमा मोहिते, प्रदीप सामेरे, सुभाष मते, रमेश भागरे, भीमदेव गोंदे, तुकाराम शिंगाडे, प्रवीण मोहिते, सुनील भोजने, अण्णासाहेब वाघमोडे, अजय टिळेकर, पंढरीनाथ राणे यांच्यासह भीमाशंकर कॉलनी, विजयराज कॉलनी आणि गणेश नगर येथील नागरिक उपस्थित होते.
‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम, प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मुख्य रस्ते प्रशस्त होत आहेत. त्याच्या जोडीला शहरातील अंतर्गत रस्ते सुसज्ज असावेत. प्रत्येक प्रभागात रस्त्यांची कामे मार्गी लावावीत. यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे प्राधान्याने मार्गी लावावीत, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
– शंकर जगताप, भाजपा, शहराध्यक्ष, पिंपरी- चिंचवड.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक -26 जानेवारी 2025) : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…