Google Ad
Editor Choice

भोसरी एमआयडीसी मधील समस्यांबाबत लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष अभय भोर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको आंदोलन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना भोसरी एमआयडीसीच्या काही भागास मात्र यातून वंचित राहावे लागले आहे. रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांच्या समस्याने त्रस्त झालेल्या भोसरी एमआयडीसी मध्ये गुरुवारी लघु उद्योजकांच्या संघटनेने रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन केले .

भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉक या परिसरात रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत . त्यामुळे विशेषतः सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी कामावर जाणाऱ्या किंवा कामावरून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे . या खड्ड्यांची दुरुस्ती वेळोवेळी केली गेली ; परंतु ते काम निकृष्ट झाल्यामुळे येथे पुन्हा खड्डे पडले आहेत .

Google Ad

महापालिकेला लघुउद्योजक मोठ्या प्रमाणावर कर देतात . परंतु त्यामानाने महापालिकेकडून लघुउद्योजकांना सुविधा मिळत नाहीत असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला . लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता पूर्ववत करण्यात यावा अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा लघुउद्योजकांचीच्या वतीने देण्यात आला आहे . या आंदोलनात लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष अभय भोर , वैभव जगताप , चंद्रकांत ठक्कर , मतीन शेख , सोनू ओहरी , कल्याण पांचाळ , आकाश बनसोडे , संकेत थोरात आणि कामगारवर्गही सहभागी झाला होता .

या अगोदरही अभय भोर यांनी परिसरामध्ये गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण यावर भोसरी एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना येणा-या विविध अडचणी सोडविण्यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड पोलिसांची बैठक एमआयडीसी भोसरी येथे घेतली होती. या बैठकीत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी उद्योजकांना त्यांच्या अडचणी लवकर सुटतील असे आश्वासन दिले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!