Categories: Editor Choice

औंध रावेत बी आर टी रस्त्यावर आरएमसी ट्रक चढला रस्ता दुभाजकावर .… हायटेन्शन टॉवर ला धडक झाली असती तर …?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जानेवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी फाटा ते रक्षक चौक दरम्यान डिसेंबर महिन्यात हायटेन्शन टॉवर वर असणारी विजेची तार हटवण्यात आली व रस्त्याच्या कडेला उंच पोल उभारण्यात आले व त्यावर ती टाकून अडथळा दूर केला, परंतु जुना सांगाडा मात्र तसाच उभा असून अजून प्रशासन का हटवत नाही हा प्रश्न आहे?

आज (दि.१५) दुपारी औंध रावेत बी आर टी रस्त्यावर भरधाव आरएमसी ट्रक रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकावर चढला आणि समोर असणाऱ्या हायटेन्शन टॉवर ला धडक होता होता वाचली. परंतु वीज वाहक तार काढली नसती आणि अपघात होऊन संबंधित टॉवर ला धडक झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

भविष्यात अशी घटना घडू नये याकरिता महानगरपालिका प्रशासनाने संबंधित टॉवर हटवून अडथळा दूर करावा तसेच या रस्त्यावर दुतर्फा सायकल ट्रॅक आणि फूटपाथ तयार करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी तो वापरण्या योग्य राहण्या करीता  रस्त्याच्या कडेला टेम्पो मधून फळ विक्री करणारे विक्रेते हटवून यापुढेही भविष्यात होणारे अपघात टाळावेत या करिता प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.

या अगोदर २०१८ ला महामंडळ बस व्हॉलो मुंबई बस या ताराना स्पर्श होऊन ac जळाला होता तेव्हापासून हे तार हटवण्याची मागणी होत होती.

Maharashtra14 News

Recent Posts

अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात….* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर, शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग….

*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे संयुक्त उपक्रमातून एक लाख देशी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन

*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…

2 weeks ago

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने दिव्यांग सर्वेक्षणासाठी आशा सेविकांना देण्यात आले विशेष प्रशिक्षण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…

2 weeks ago

शंभरपेक्षा अधिक घरफोड्या, सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर  : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…

3 weeks ago

पुण्यात इंटेन्सिफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयात ‘एचआयव्ही’बाबत जागृती

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…

3 weeks ago