Google Ad
Editor Choice

सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निवरणा करीता … आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या कार्यालयात महावितरण अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढत असून त्या प्रमाणात ग्राहकांना सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या वतीने कामकाजाविषयी आढावा बैठक महावितरण चे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांच्या बरोबर कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली.

शहरातील नवी सांगवी- सांगवी, काळेवाडी, वाल्हेकरवाडी  या व अशा अनेक भागांत वीज खंडित होणे यासह वीज वितरण संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबतीत नागरिक हैराण झाले असून या बाबत वारंवार तक्रारी वाढत आहेत, शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा पुरविणे हे स्थानिक प्रशासन  यांचे काम आहे. या वाढत्या तक्रारीचे निवारण करण्याकरीता या बाबत शंकर जगताप यांनी महावितरणचे अधिकारी आणि विविध विभागातील नागरिकांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करून त्या तत्काळ सोडवण्यासाठी निर्णय घेण्यात आले.

Google Ad

या वेळी बैठकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघात महावितरणचे फिडर बॉक्स, नवीन केबल टाकणे आदी कामांसाठी निधीची तरतूद करावी लागणार, तसेच मनुष्यबळ कमी पडत असल्याने ते पुरवणे या विषयावर चर्चा झाली, तसेच या सर्व कामांकरिता सर्वोतोपरी मदत करण्याचे शंकर जगताप यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, संतोष कांबळे, सागर आंघोळकर महावितरण चे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, अतिरिक्त अधिकारी अशोक जाधव, सहाय्यक अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) ननावरे, आर एम काळे, बालगुडे, के डी जाधव, शितल मेश्राम आदी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!