Google Ad
Editor Choice Maharashtra

पिंपरी-चिंचवड, पुण्यातील निर्बंध उठणार … जाणून घ्या, काय सुरु आणि काय बंद राहणार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जून) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश हा चौथ्या स्तरात होतो. त्यानुसार आजपासून पुण्यातील कोरोना निर्बंध काहीप्रमाणात शिथील करण्यात येणार आहेत.

या नियमावलीनुसार पुणे जिल्ह्यातील अत्यावश्यक दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अन्य दुकाने बंदच राहतील. या जिल्ह्य़ात संचारबंदी कायम राहील. तर पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने त्याठिकाणी सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू असणार आहेत.

Google Ad

तर शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने याच वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच  पिंपरी चिंचवड, पुण्यातील पीएमपी बससेवाही आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. सार्वजनिक बस वाहतूक सुरु झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहरातील 179 मार्गांवर आजपासून 496 बस धावणार आहेत.

▶️पिंपरी चिंचवड, पुण्यात काय काय सुरु राहणार?

1. हॉटेल, रेस्टॉरंट – ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने
2. हॉटेल – शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा
3. लोकल – फक्त अत्यावश्‍यक सेवा कर्मचारी
4. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत
5. खासगी कार्यालये – ( सोमवार ते शनिवार ) दुपारी 4 पर्यंत ( 50 टक्के कर्मचारी क्षमता)
6. क्रीडा – सकाळी 5 ते 9 , सायंकाळी 6 ते 9 रिकाम्या जागा, मैदानात

7. चित्रीकरण – बायोबबल , सायंकाळी 5 पर्यंत
8. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम -50 जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत
9. लग्न समारंभ – 50 जणांच्या उपस्थितीत
10. अंत्यविधी – 20 जणांच्या उपस्थितीत
11. शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – 50 टक्के उपस्थिती

12. बांधकाम – दुपारी 4 पर्यंत मुभा
13. शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत
14. संचारबंदी – शहरात सायंकाळी पाचनंतर
15. जिम, सलून, ब्युटी पार्लर – 50 टक्के क्षमतेने , पूर्व नियोजित वेळ घेऊन
16. सार्वजनिक वाहतूक सेवा -50 टक्के क्षमतेने केवळ बसून
17. ई कॉमर्स – नियमित वेळेत
18. मला वाहतूक – नियमित वेळेत

Google Ad

About the author

Maharashtra14 News

54 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!