“जगद्गुरूंच्या चरणी १५ लाखांचे दान”
खराडी येथे प्रवचनात आवाहन केले आणि ज्येष्ठ नेते, मा.पंढरीनाथ आण्णा पठारे यांनी लगेच घरी येण्याचा आग्रह केला आणि त्वरित जगद्गुरूंच्या मंदिरासाठी माझ्याकडे केला १५ लाखांचा चेक सुपूर्द (१५,०००,००/- रू.)पंकज महाराज गावडे
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ एप्रिल) : मा. आमदार बापूसाहेब (आप्पा) पठारे यांनी ह भ प पंकज महाराज गावडे यांना खराडी, पुणे येथे प्रवचन सेवेसाठी निमंत्रित केले होते या वेळी प्रवचन पूर्णत्वाला येत असताना गावडे महाराजांनी जगद्गुरु संत तुकोबाराय ह्यांच्या १२५ कोटी रुपयांच्या मंदिरासाठी खराडी येथून मागे मदत झाली आहे आणि आता पुढील काही दिवसात २५ लाख रुपये मिळतील हा आशावाद व्यक्त केला.
त्यावेळी मा. पंढरीनाथ आण्णा पठारे म्हणजे खराडी चे सलग १५ वर्ष सरपंच पद निर्विवादपणे भूषविणारे, विशेष म्हणजे आण्णांच्या वडिलांनी देखील सलग २१ वर्ष गावचे प्रमुख पद भूषविले होते आणि ज्यांना तत्कानील जिल्यातील सर्व ज्येष्ठ नेते तुकाराम महाराज म्हणत इतके ते सात्विक होते आणि त्यांचेच हे ज्येष्ठ चिरंजीव पंढरीनाथ आण्णा पठारे एक नामांकित पैलवान म्हणून क्रीडा क्षेत्रात स्वतःची मोठी ओळख निर्माण करणारे, राज्याचा क्रीडा क्षेत्रांतील राजे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त, आज पर्यंत अनेक कलाकार, खेळाडू यांना आश्रय देणारे, १९५९ चे पाहिले हिंद केसरी श्रीपत खंचनाले व एशिया चॅम्पियन गणपत श्रांधलकर ज्यांची कुस्ती ही पंडित जी नेहरू आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे हस्ते लावली गेली आणि ७० मिनिटे कुस्ती झाली परंतु ती बरोबरीत सुटली असे त्यावेळचे महान कुस्तीगीर श्रीपत जी हे ज्यांचे विनम्रपणे दर्शन घेत असे अनेकांचे आश्रय दाते आणि तत्कालीन नगर हायवे ते सोलापूर हायवे ज्यांचा प्रचंड आदर युक्त दरारा होता, यशवंतराव चव्हाण साहेब, अनंतराव थोपटे साहेब ते शरदचंद्र जी पवार साहेब ह्यांच्या बरोबर जिव्हाळा असणारे, मा. आमदार बापूसाहेब उर्फ आप्पा पठारे यांचे ज्येष्ठ बंधू, सुरेंद्र जी, महेंद्र जी, रवींद्र जी या सर्वांचे मार्गदर्शक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, सहकार, कृषी आणि आध्यात्म क्षेत्रात मोठा सहभाग नोंदवून भरीव योगदान देणारे मा. पंढरीनाथ आण्णा पठारे होय.
यावेळी बोलताना पंकज महाराज गावडे म्हणाले, ” आण्णा व आप्पा हे दोघेही खराडी आणि परिसराच्या विकासात मोठे योगदान देणारे बंधू, मा.आय. ए. एस. कांतीलाल उमाप साहेब, मा. नेव्ही ऑफिसर व मा. इन्कमटॅक्स कमिशनर संभाजी उमाप साहेब यांचे सासरे आदरणिय पंढरीनाथ आण्णा पठारे यांनी प्रवचन संपल्यावर जाहीर सांगितले की पंकज महाराज यांचा शब्द नक्की पूर्ण होईल मी पूर्वी ११ लाख त्यांना देतो म्हणालो होतो परंतु त्यांनी आता लगेच घरी यावे मी त्यात ४ लाखांची वाढ करतो आणि १५ लाख रुपयांचा चेक लगेच देतो, त्या प्रमाणे प्रवचन झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी आम्ही पोहचलो तर आण्णा तब्येत बरी नसताना ही पुढे जाऊन आमची फराळाची काळजी घेत होते आणि मी घरी पोहचलो तर त्या अगोदरच १५ लाख रुपयांचा चेक लिहून माझ्या हातात त्यांनी सुपूर्द ही केला. या वेळी आण्णा यांच्या समवेत चर्चा करताना जुन्या काळातील व्यवस्था आणि संस्कृती समजावून घेत होतो या वेळी त्यांच्या कन्या ज्या ओरिजनल बिस्लेरी ब्रँड चे प्रॉडक्शन्स पाहतात आणि स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात त्या सौ. सुनिता ताई उमाप – पठारे या आण्णा यांच्या बद्दल आपल्या हृदयपूर्वक भावना व्यक्त करत असताना आपल्या वडिलांबद्दल भरभरून बोलताना अलगद त्यांचे डोळे अश्रूंनी दाटून आले होते आणि त्या प्रसंगी बाणेदार असणारे आण्णा ही भावूक झालेले पहिल्यांदा मी पाहिले. लवकरच पंढरीनाथ आण्णा ज्यांना सर्वजण पंडा आण्णा असे कौतुकाने आवाज देत असतात त्यांच्या जीवनावर एक पुस्तक येत आहे त्यात आण्णांच्या आग्रहास सन्मान देऊन मी ही त्यात एक लेख लिहिणार आहे. या वेळी त्यांचे सुपुत्र महेंद्र भाऊंनी ही आपली भविष्याची वाटचाल कशी असेल याची पुसटशी कल्पना दिली. आण्णा यांचा सन्मान त्यांचे वय पाहता घरी जाऊन श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट चे वतीने व्हावा ही माझी इच्छा मी अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील, उपाध्यक्ष विजू भाऊ बोत्रे आणि विलास काका लांडे पाटील यांना बोलून दाखवली आणि मोठ्या आनंदाने यांनी आपण नक्की जाऊ हा शब्द मला दिला आहे.
या प्रसंगी गावडे महाराज याांांह्या समवेत पुणे येथील उद्योजक लक्ष्मण जी बांदल, पिसोळी देविदास मासाळ, कोंढवा येथील मा. नगरसेवक संजय भाऊ लोणकर, वडगाव शेरी चे उद्योजक रंगनाथ जी गलांडे पाटील, अनिल पाटील, उद्योजक स्वप्नील मासाळ, तळेगाव दाभाडे संजय बाविस्कर नगरसेवक आप्पा साहेब बागल, रामदास महाराज साखरे उपस्थित होते.
आपण केलेली १५ लाख रुपयांची मदत माझ्या कायम स्मरणात राहील की मी आवाहन केले आणि आपण लगेच त्याला प्रतिसाद दिला, आण्णांसाठी जगद्गुरु संत तुकोबाराय ह्यांच्या कृपेने पांडुरंगाचे चरणी हीच प्रार्थना करतो की प्रिय आण्णा यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे, असे गावडे महाराज म्हणाले.