Google Ad
Editor Choice

एससी आणि एसटीसाठी राखीव आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यमान आणि इच्छुकांची गोची … आता मार्ग कोणता ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ मे) : मुंबई , ठाणे , पुणे , पिंपरी चिंचवडसह १४ महानगरपालिका , २५ जिल्हा परिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या प्रस्तावास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखवला .

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून आता प्रतिक्षा आरक्षण सोडत कधी होणार त्याची आहे. राज्यातील महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे . त्यानुसार प्रभागांचे प्रारूप अंतिम केले आहे .

Google Ad

अनुसूचित जमातीसाठी (ST) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे . अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी (SC) १६ टक्के आरक्षण आहे . त्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये १३९ सदस्यांच्या महापालिका सभागृहात २२ अनुसूचित जातीचे सदस्य असतील . त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी ११ असेल .

▶️अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी :-

महापालिकेची १३९ नगरसेवक संख्या असणार आहे. तर, एकूण ४६ प्रभाग असणार आहेत. पिंपरी चिंचवड मनपाच्या हद्दीत अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी प्रभाग ४१, ४४ आणि ६ हे प्रभाग आरक्षित असतील. त्यातील पिंपळे गुरव भागात ४१ आणि ४४ हे दोन प्रभाग येतात यात एससी, एसटी दोन जागा राखीव राहतील. प्रभाग ४४ हा अगोदर च्या रचनेत वेगळा होता, परंतु प्रभाग तोडातोडीच्या राजकारणात दोन जागेवर आरक्षण पडल्याने परिस्थिती बदलली आणि ‘कही खुशी कही गम!‘ अशी परिस्थिती निर्माण झाली.  त्यामुळे खुल्या जागेवर इच्छुक जास्त तर जागा कमी ही परिस्थिती पहायला मिळत आहे, त्यामुळेच खुल्या प्रवर्गातील एका जागेसाठी मोठी चुरस होणार आहे. त्यातही ही खुली जागा महिला की खुली ते आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर स्पष्ठ होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून इच्छुक असलेले व विध्यमान यांच्यात मोठी चुरस पहायला मिळणार हे नक्की!

पिंपरी चिंचवड शहराचा नगरसेवक होणे म्हणजे एखाद्या भागाचा आमदार असल्या सारखे असते, कारण कामासाठी भरगोस निधीची उपलब्धता असते, त्यामुळे शहरात वर्षानुवर्षे नगरसेवक होण्याची अपेक्षा बाळगून जनतेत या ना त्या कारणाने आपल्याच भागात चमकणाऱ्यांना या आरक्षणामुळे पंचायत झाली आहे. ते दुसरीकडे उडीही मारू शकत नाहीत कारण त्या भागात त्यांचे काहीच कार्य नसले तर अवघड होऊ शकते. जरी उडी मारली तरी तेथे आगोदर मारामारी आणि आपले लोक आणि कार्यकर्ते नसल्याने निवडून येण्याची शास्वती नाही.

एससी आणि एसटीसाठी राखीव आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यमान आणि इच्छुकांची गोची झाल्याने आता, मार्ग कोणता ? हे नेते, जनता आणि येणारा काळच ठरवेल.

असे असेल प्रभाग व संख्येनुसार आरक्षण:-

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!